आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झरदारी पायउतार होण्‍यास तयार, पाकिस्‍तानात राजकीय वातावरण तापले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबादः पाकिस्‍तानात राजकीय अस्थिरतेचे सावट आणखी गडद झाले आहे. एनआरओ वादमुळे विरोधकांच्‍या टार्गेटवर आलेले राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी पायउतार होण्‍यास तयार असल्‍याचे वृत्त आहे. पाकिस्‍तानाच्‍या संसदेचे उद्या 12 जानेवारी रोजी विशेष सत्र बोलाविण्‍यात आले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण पुन्‍हा एकदा ढवळून निघाले आहे.
झरदारी यांनी काल सहकारी पक्षांसोबत बैठक घेतली. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार या बैठकीत त्‍यांनी राजीनामा देण्‍यास तयार असल्‍याचे सांगितले. सहकारी पक्षांच्‍या पाठींब्‍यामुळेच ते राष्‍ट्रपदीपदावर आहेत. हे पक्ष जेव्‍हा सां‍गतील त्‍यावेळी राजीनामा देऊन निवडणुका घेऊ, असे झरदारी यांनी स्‍पष्‍ट केले. झरदारी आणि पंतप्रधान युसुफ गिलानी यांनी सहकारी पक्षांसोबत बैठक घेतली. त्‍यानंतर पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टीच्‍या कोअर समितीची बैठक घेण्‍यात आली. या बैठकीत समितीच्‍या सदस्‍यांनी झरदारी आणि गिलानी यांच्‍या नेतृत्त्वावर विश्‍वास ठेवून पुढचा निर्णय घेण्‍याचे अधिकार दिले आहेत.
पाकिस्‍तानच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने एनआरओप्रकरणी निर्वाळा दिला होता. तसेच पंतप्रधान युसुफ गिलानी हे अप्रामाणिक असल्‍याचे ताशेरेही न्‍यायालयाने ओढले होते. त्‍यानंतर राजकीय चर्चेला ऊत आले आहे.
सर्वोच्‍च न्‍यायलयाने काल ताशेरे ओढल्‍यानंतर गिलानी यांनी प्रत्‍युत्तर दिले आहे. जनतेने निवडलेला प्रतिनिधी असल्‍यामुळे घटनेचे पालन करण्‍यासाठी कोणाच्‍या निर्देशांची गरज नसल्‍याचे गिलानी यांनी म्‍हटले आहे.
सर्वोच्‍च न्‍यायालयाने परवेझ मुशर्रफ यांच्‍या शासनकाळात डिसेंबर 2009 मध्‍ये जारी केलेल्‍या एका अध्‍यादेशाला रद्द केले होते. त्‍या अध्‍यादेशानुसार झरदारी यांच्‍यासह 8 हजार लोकांना भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणातून सरसकट माफी देण्‍यात आली होती. तेव्‍हापासून न्‍यायालयाने या प्रकरणाची नव्‍याने चौकशी करण्‍यासाठी दबाव आणला आहे. परंतु, सरकारने न्‍यायालयाच्‍या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. राष्‍ट्रपतींना अशा प्रकरणांमध्‍ये निर्णय घेण्‍यासाठी विशेष अधिकार आहेत. याच प्रकरणात काल न्‍यायालयाने कडक ताशेरे ओढताना गिलानी हे अप्रामाणिक असल्‍याची टीका केली होती.
युसूफ गिलानी इमानदार नाहीत; पाकच्या सुप्रीम कोर्टाचे मत
इम्रान खानचा पक्ष संधीसाधूंचा गोतावळा - गिलानी
सरकार पाडण्‍यासाठी षड्यंत्रः युसुफ गिलानी यांचा आरोप
पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांना पदच्यूत होण्याची भीती
पाकिस्तानात शांततापूर्ण सत्तातंर; गिलानी-बिलावलकडे सूत्रे, अफवेमागे आयएसआय?