आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन वीकमध्ये जेन नेक्स्टच्या कलेक्शचे सादरीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅशन लॅक्मे वीक विंटर फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी फॅशनचे विविध रंग पाहायला मिळाले. मुंबईतील ग्रॅण्ड हयातमध्ये हा शानदार इवेंट सुरु झाला आहे.
पहिल्या दिवशी नवोदित फॅशन डिझायनर्सचे कलेक्शन सादर झाले. त्यांच्या या शोला जेन नेक्स्ट असे नाव देण्यात आले होते. आस्था सेठी आणि सिद्धार्थ अरोडा यांचे खास वुमनवेअर कलेक्शन सादर झाले. त्यांनी आपल्या या कलेक्शनचे 'कॉमिकल फेलो' असे हटके नाव ठेवले होते. त्यांच्या या कलेक्शनमध्ये शाईनिंग यलो, ब्लू आणि ब्लॅक कलरचा प्रभाव पाहायला मिळाला.
मेहक पृथी, कनिका सेठ आणि अंकित शर्मा यांच्या कलेक्शनमध्ये थ्रीडी 'अवतार'चा प्रभाव दिसला. जांभळा, एसिड ग्रीन आणि ब्लॅक कलरचे कॉम्बिनेशन त्यांच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळाले.
कविता शर्माने आपल्या कलेक्शनमध्ये मुलांनी चित्र काढावे तसे चित्र आपल्या कलेक्शनमध्ये वापरले. लाँग स्कर्ट आणि टॉपचे कलेक्शन कविता शर्माने सादर केले. स्नेहा अरोडाच्या फिमेल मॉडेल्स कुल कार्पोरेट लूक असलेले आरामदायी कलेक्शन सादर करताना दिसल्या.
जेन नेक्स डिझायनर अंकित साठमने त्याच्या कलेक्शनचे नाव 'आरंभ' असे ठेवले आहे.