आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन वीकमध्ये dainikbhaskar.com चा रेकॉर्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शुक्रवारपासून सुरू झालेल्या लॅक्मे फॅशन वीकची प्रत्येक घडणारी बातमी divyamarathi.com आणि आमचीच हिंदी वेबसाइट dainikbhaskar.com वर उपलब्ध आहे. या प्रसिध्द फॅशन शोच्या इतिहासात प्रथमच प्रत्येक घडणार्‍या घटनांचे अपडेट (फोटो सहित) वाचकांपर्य़ंत पोचवण्यासाठी एखाद्या वेबसाइटसोबत टाय अप करण्यात आले आहे.
मार्सेल्स बॅप्टिस्टा divyamarathi.com आणि dainikbhaskar.com साठी लॅक्मे फॅशन वीकचे रिपोर्टींग करत आहे. बॅप्टिस्टा हे नाव जगभरात चांगल्या लाइफस्टाईलसाठी प्रसिध्द आहे.
या शोमध्ये पहिल्यांदाच प्रसिध्द डिझायनर्स ऐवजी तरूण डिझायनर्सना संधी देण्यात आली आहे. या शोमध्ये कलोल दत्ता, पंकज आणि निधी यांसारखे नावं देखील सहभागी झाले आहेत. पल्लवी जयकिशन ही नवोदित डिझायनर पहिल्यांदाच सहभागी होत आहे. पहिल्यांदाच तिला तिची कलाकुसर दाखवण्याची संधी मिळणार आहे.हा कार्यक्रम मेन्टॉर डिझायनर आणि स्टायलिस्ट अक्की नरूला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
या शोमध्ये अनिकेत सातम, आस्था सेठी, सिध्दार्थ अरोरा, कविता शर्मा, मेहक, काइना सेठ, रिचा अग्रवाल,स्नेहा अरोरा यांचे कलेक्शन देखील बघायला मिळणार आहे. या शोसाठी काही मॉडेल्स पहिल्यांदाच कॅटवॉक करणार आहेत. ज्यामध्ये ज्योतप्रिया, जामी, श्वेता,पारूल, नताशा आणि स्टेला यांचा सामावेश आहे. याची सुरुवात जया जेटली आणि कृष्णा मेहता यांच्या पॅनल डिस्कशनने होणार आहे. या शोमध्ये ८६ डिझायनर्ससमवेत १० स्पॉन्सर्स सहभागी झाले आहेत.

विशेष म्हणजे यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये भारतीय संस्कृतीला उत्कृष्टपणे सादर करणा-या डिझायनरला पहिल्यांदाच एक खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशीच्या काही खास गोष्टी...
लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळी फॅशन डिझायनर श्रध्दा मुरारका आणि निनोन यांच्या लेटेस्ट कलेक्शनचा जलावा बघायला मिळाला. नव्या अंदाजात तयात करण्यात आलेल्या या डिझाईन्समधून सप्तरंगी ऋतू झळकतांना दिसून येत होता.
तर, एलीगेंट जॅकेट्स, स्कर्ट, जर्सी ट्रंक्स आणि स्वीपिंग रेड कार्पेट गाउंन्स देखील सादर करण्यात आले. या डिझाईन सोबत घालण्यात आलेल्या ब्लू=ब्लॅक लेदर शुजमुळे शोभेत आणखीन भर पडत होती.
क्रिम आणि भुरक्या रंगात रफल्स गुंढाललेल्या मॉडेल्स रॅम्पवर आल्यानंतर कॅटवॉकची शोभा वाढली. ओव्हरलॅन्ड कटआउट ड्रेस, सिल्क शर्ट, लेदर स्लीव्स आणि निळ्या रंगाचे जॅकेटवर कट ले स्कर्ट यांचे कॉम्बिनेशन पाहण्यासारखे होते.
प्रसिद्ध डिझायनर पायल सिंघलच्या या शोमध्ये भारताचे रुप झळकले. या शोमध्ये भारतीय सौंदर्य पाहायला मिळाले. रॅम्पवर राजस्थानची परंपरा झळकली आणि गुलाबी रंगाने सगळ्यांचे मन मोहून घेतले.
या शोमध्ये उत्तर भारतातील काळानुरुप बदलेल्या फॅशनचीही झलक दिसली. येथे भारतीय आदिवासींच्या वेशभूषेबरोबरच कच्छ आणि गुजरातचे रंग दिसले.
या रंगीबिरंगी वेशभूषेद्वारे एकप्रकारे भारताच्या संस्कृतीला सलमा करण्यात आले. शोमध्ये एकीकडे मॉडेल्स कन्टेम्परेरी लूकचे कुर्ते, कप्तान, ट्युनिक, काळी साडी आणि शॉर्ट लहंगामध्ये दिसल्या तर दुसरीकडे अर्बन लूकमध्ये एम्ब्रॉइडरी आणि जरदोसी वर्कही दिसले.