आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखनात लोकमनाचे प्रतिबिबं असते मात्र, वास्तवाची कोंडी नको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहास लेखन हे अल्टिमेट त्रिकालबाधित सत्य नसते, कारण त्यातही वास्तववादी, राष्ट्रवादी आणि धर्म-जातवादी या प्रकारचे लेखन असते. जातीयवादी इतिहास लेखनात वास्तव कमी ललित लेखनच जास्त असते. इतिहास लेखकाचा व्यक्तिगत प्रभावही तेथे येतोच याची पुढची पायरी वा गरज म्हणून इतिहास ललित लेखनाकडे पाहायला हवेच हे लेखन आजच्या गरजेतून आलेले आहे. प्रत्येक समाजाचे गटाचे हीरो नायक ठरलेले आहेत. मग या स्पर्धेत आपला हीरो मागे पडायला नको, या भावनेतून इतिहास ललित लेखन सुरू झाले, असे दिसते. अर्थात ते वास्तवापासून दूर आहे. असे इतिहास लेखन उद्दिष्टपूर्वक (टारगेट) केले जाते.
सामान्यांना इतिहासाशी काही देणे घेणे नाही त्यांच्या लोकमानसात काही गोष्टी अपेक्षित असतात त्याच्या म्हणजे लोकधारेत हा इतिहास ललित लेखनाच्या रूपात बसवून घेतला जातो. इतिहासपुरुषाचे दैवतीकरण आले की, या गोष्टी म्हणजे इतिहास ललित लेखन येते. यात मनोरंजन लोकानुनय म्हणजे रंजनवाद, रोमॅन्टिसिझम व मिथ्यावाद येतो. मात्र, याचा अतिरेक झाला की, लोकांना याचा उबग येतो. यावरूनच पुराणातील वांगी पुराणातच राहू द्या, अशी म्हण प्रसिद्ध झाली.
इतिहास लेखन जेथे थांबते तेथे साहित्य निर्मिती सुरू होते. मग यात म्हणजे इतिहास ललित लेखनात केवळ प्रथम प्रतीचेच हीरो निवडले जातात त्यावर सकारात्मक लिहिले की तुम्ही प्रसिद्ध झालेच समजा. इतिहास लेखनात जिथे कागदपत्र नाहीत तेथे ललित लेखनाला भरपूर जागा (स्कोप) असतो. येथे सर्व लोकमनाचा धागा पकडला व तो फुलवला की झाले काम. भावनिक, भावात्मक, टची, वेदनेचे विश्लेषण केले की, झाले वाचक त्यात गुंततात यामुळे हा भावनेचा बाजार आहे. यात प्रसंगाची अचूक निवडही महत्त्वाची ठरते.
इतिहास हे अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले भूत आहे व त्यातून कोणाचीच सहजासहजी सुटका होऊ शकत नाही, असे असले तरीही इतिहास ललित लेखन झाले पाहिजे, कारण शाहिरी पोवाड्यांमुळेच लोकनायक, घटना-प्रसंग घराघरात पोहोचले. मात्र, अशा ललित लेखनाच्या प्रारंभी असं स्पष्ट लिहावं की, यातील घटना, पात्र काल्पनिक आहेत. हा खरा इतिहास नव्हे. माझ्या मते इतिहास ललित लेखक अनेक ठिकाणी वातावरणनिर्मिती करताना गडबड करतात, या अतिरंजकेतेतून तारतम्य न बाळगल्याने संबंधित व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण होण्याऐवजी काही प्रसंगात कधी अनादर होतो. यामुळे अशा इतिहास ललित लेखकाला माझ्या मते विशेष प्रशिक्षण (टेÑनिंग) द्यावे व त्याला काय करावे, काय लिहू नये हे कटाक्षाने सांगावे. यात त्याने किमान डेकोरम मेंटेन करावा, असे अपेक्षित आहे. मग यामुळे अनेकदा कादंबरीतील दुय्यम पात्र नायकाचे सल्लागार बनतात व मुख्य व्यक्तिरेखेपेक्षा मोठी होतात, असेही दिसते. त्यात राजघराण्याचा किमान प्रोटोकॉल तरी पाळावा, असे होऊ शकते का याचे तारतम्य ठेवून विचार करावा. यामुळे मग वास्तवातला नायक अडचणीत येतो, असे दिसते त्यामुळे इतिहास ललित लेखनात तुम्हाला स्वातंत्र्य जरूर आहे. मात्र, वास्तवाची कोंडी करू नका.