आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी खासदारकी सोडा मग राष्‍ट्रवादीत जाः शिवसेना नेत्‍यांचा परांजपेंवर हल्‍लाबोल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंद परांजपे यांनी बंडखोरी करीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश करण्‍याचे संकेत दिले. परंतु, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये जायचे असल्‍यास त्‍यांनी सर्वप्रथम खासदारपदाचा राजीनामा द्यावा, मगच जावे, असा कडाडून हल्‍ला शिवसेनेच्‍या नेत्‍यांनी चढविला आहे.
आनंद परांजपे यांनी आज दुपारी शरद पवार यांच्‍या पत्रकार परिषदेत उपस्थिती दाखवून मोठा धक्‍का दिला. पत्रकार परिषदेत ते अचानक उपस्थित झाले आणि एकच खळबळ उडाली. पुर्वीसारखी शिवसेना आता राहीलेली नाही. दिवंगत आनंद दिघेंच्‍या अंत्‍ययात्रेत ज्‍यांनी गुलाल उधळला त्‍यांना आता शिवसेनेत परत घेण्‍यात येत आहे, अशी टीका परांजपे यांनी या पत्रकार परिषदेत केली. त्‍यामुळे शिवसेनेच्‍या नेत्‍यांमध्‍ये संताप उसळला. प्रताप सरनाईक यांनी परांजपेंवर टीका करताना सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा देण्‍याची धमक दाखवायला हवी होती, असा हल्‍ला चढविला. परांजपे यांची लायकी नसताना केवळ वडीलांच्‍या पुण्‍याईमुळे खासदारकी मिळाली, असे सरनाईक म्‍हणाले. ठाण्‍याचे आमदार एकनाथ शिंदे यांनीही परांजपे यांच्‍यावर टीका केली. परांजपे यांनी शिवसैनिकांच्‍या पाठीत खंजीर खुपसला, अशी प्रतिक्रीया दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही अशाच शब्‍दांमध्‍ये परांजपेंवर तीव्र नाराजी व्‍यक्त केली.