आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्हासनगरमध्ये नराधम पित्याचे मुलीवर अत्याचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - उल्हासनगर येथील भय्यासाहेब आंबेडकरनगरमध्ये राहाणा-या नराधमाने दारुच्या नशेत स्वतःच्याच पाचवर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास शंकर देठे (३५) दारु पिऊन घरी आला. पत्नी लोकलट्रेनमध्ये फळविक्रीसाठी गेली होती. मोठी मुलगी शाळेत होती. याचा फायदा घेत या नराधमाने स्वतःच्याच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केले. ती बचावासाठी आक्रोश करत असताना त्याने तिचे तोंड दाबून धरले.
पीडित मुलीच्या आजीला तिची अवस्था पाहून घडला प्रकार लक्षात आला. तिने शंकरला मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा तो पसार झाला. मुलीला तत्काळ उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला.
दरम्यान, उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शंकरवर गुन्हा दाखल केला आहे.
(सोबतचे छायाचित्र प्रतिकात्मक आहे.)
पैसे न दिल्याने मामानेच केला भाचीवर अत्याचार!
मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी समिती
बाल लैंगिक शोषण आणि आपण
\'अपना घर\'मध्ये मुलींचे होते लैंगिक शोषण