आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - रणरागिणी : छेड काढणार्‍यास तरुणीने चपलेने चोपले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शाळा-महाविद्यालये सुरू होताच रोडरोमिओंनी डोके वर काढले आहे. शहरातील ठरावीक पॉइंटवर तरुणीची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. रोडरोमिओंसाठी तयार करण्यात आलेले पथक चार महिन्यांपासून कार्यान्वित नाही.
महाविद्यालयांच्या थांब्यांजवळ रोडरोमिओ थांबतात आणि ठरावीक वेळेत मुलींची छेड काढतात. काही तरुणींचा दुचाकीवरून पाठलागही केला जातो. मुलींचे मोबाइल क्रमांक घेण्याचा प्रयत्न केला जातो. छेड काढल्याची बहुतांश तरुणी पोलिसांत तक्रार करत नाहीत किंवा पाल्यानांही सांगत नाहीत.
पथक निष्क्रिय
चार महिन्यांपूर्वी पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले होते. या पथकाने 250 पेक्षा अधिक रोडरोमिओंविरुद्ध कारवाई केली होती. त्यांच्याकडून दहा हजार दंड वसूल केला होता.
आमची छेड काढली तरी आम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकत नाही. घरच्याकडे तक्रार केली तर ते महाविद्यालयात पाठवणार नाहीत.’’ अश्विनी, (बदललेले नाव आहे)
एक तरुण रोज माझ्या मागे दुचाकीवरून पाठलाग करतो. मात्र, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. त्याने माझा पाठलाग केल्याने माझे काहीच बिघडत नाही.’’ रोहिणी, विद्यार्थिनी, (नाव बदललेले आहे)
रोमिओंचे पॉइंट
सरस्वती भुवन महाविद्यालय चौक, निराला बाजार, सावरकर चौक, क्रांती चौक पोलिस ठाणे चौक, सिडकोतील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाबाहेरील परिसर, सिडको बसस्थानक, नाईक महाविद्यालय समोरील परिसर, हडको कॉर्नर, आझाद चौक, कैलास आर्केड परिसर, पदमपुरा चौक, वेणुताई चव्हाण हायस्कू लसमोरील परिसर
कराटे गर्लने केली सडक सख्याहरींची धुलाई
'राहुलने केलेली मारहाण आठवली की अंगावर शहारा येतो'
हृदयरोग्याला मारहाण करणार्‍या चौघा पोलिसांच्या चौकशीचे आदेश