आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बलात्कार, अपहरण अन् हत्येच्या घटनांनी हादरला महाराष्‍ट्र!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अ' फॉर अपहरण..., 'ब' फॉर 'बलात्कार'..., तर 'ह' फॉर 'हत्या'..., अशी 'अघोरी बाराखडी' समाजात रूजू होताना दिसत आहे. एखाद्या लहान मुलाने 'ब' फॉर 'बलात्कार' उच्चारले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. यात त्याची चूक तरी ती काय? इतका हा शब्द आता अबालवृद्धांना परिचयाचा झाला आहे.
महाराष्ट्रातील गुन्हेगारी यंदाच्या पहिल्या तिमाहीत घटली असल्याचे आकडे सांगतात. हत्या, बलात्कार, दंगल आणि घरफोड्या अशा गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात मार्चअखेर घट दिसून आली होती. परंतु एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घट गुन्हेगारांनी भरुन काढल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसते.
गेल्या आठवड्यात महाराष्‍ट्रात घडलेल्या अपहरण, बलात्कार आणि हत्येच्या घटना इतक्या भयंकर आहेत की त्या वाचून, ऐकून तसेच पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
ठाण्यात प्राध्यापकाने केलेले दुहेरी हत्याकांड तर अवघ्या तीस हजार रूपयांसाठी ठाण्यात झालेले मोनूचे अपहरण, नाशकात प्रेमात अडसर ठरणार्‍या आईचा मुलीकडून करण्‍यात आलेला खून तसेच नागपूरात संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या पोरीचा गळा चिरुन आईने दिलेला नरबळी मात्र त्यानंतर मातेनेच केलीली आत्महत्या. या घटना फारच गंभीर आहे.
दुसरीकडे औरंगाबादेत विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त पो‍‍लिस अधिकार्‍याच्या बंगल्यावर झालेला सामूहिक बलात्कार तर ब्ल्यु फिल्म दाखवून नागपूरातील हुडकेश्वर परिसरात झालेला दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनांनी तर राज्यात प्रचंड भीतीचे निर्माण झाली आहे. महिला आणि तरूणींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनांच्या माध्यमातून महाराष्‍ट्रातील 'क्राईम रेट' दिवसागणित वाढत असल्याचेही दिसून आले आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रातील गुन्हेगारीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याने, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, बालकांवरील अत्याचार, अपहरणाच्या घटना, फसवणुकी करणार्‍यांचे पेव फुटले आहे.
राज्यभरात महिलांवरील लैंगिक अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना स्थानिक पोलिस प्रशासन जागरूक नसल्यामुळे घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचाही आरोप केला जा‍त आहे.
संपत्तीच्या हव्यासापायी पोटच्या पोरीचे काळीज कापले, आईचीही आत्महत्या
ब्‍ल्‍यू फिल्‍म दाखवून नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
अवघ्या तीस हजारांसाठी अपहरण; आरोपी अटकेत
नाशकात प्रेमात अडसर ठरणार्‍या आईचा मुलीकडून खून
ठाण्यात दुहेरी हत्याकांड; पत्नी, मुलीची हत्या करून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
14 वर्षीय मुलीवर गँगरेप, माजी डीवायएसपीच्या घरात पाच मुलांचे कुकर्म