आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीतील चांडाळ चौकडीविरोधात माझी प्रामाणिकपणाची लढाई - धनंजय मुंडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - मला कोणाचाही अपमान करायचा नाही. मात्र, राजकारण करताना कार्यकर्त्यांच्या नरड्यावर कोणी पाय देण्याचे काम करणार असेल, तर त्याला रोखण्यासाठी दुसऱयांची मदत घ्यायला लागली तर आम्ही नक्की घेऊ, असे सूचक वक्तव्य आमदार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी येथे केले. धनंजय यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी स्वागतपर केलेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी स्थानिक राजकारणाबद्दल भाष्य केले. आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे. परळीच्या विकासासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही फार लहान कार्यकर्ते आहोत. त्यामुळे खरं बोललो, तरी ते खोटं ठरवले जाईल आणि ते मोठे नेते असल्यामुळे खोटं बोलले तरी खरं ठरेल, अशी सध्या परिस्थिती आहे. परळीतील सामान्य कार्यकर्त्यांचे कौतुक पाहण्यासाठीच मी इथे आलो आहे. नगरपरिषद निवडणुकीत मी बंड केले, असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण, हे बंड पक्षातील नेतृत्त्वाविरोधात नसून, ते परळीतील चांडाळ चौकडीच्या विरोधात होते. या चांडाळ चौकडीच्या विरोधातील प्रामाणिक लढाई आता सुरू झाली आहे.
मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. तरी परळीचा विकास हा जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे यापुढे जर आता पक्षाने माझ्यावर कारवाई केली. तरी मीही पुढील निर्णय घ्यायला मोकळा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंडितअण्णा मुंडे - चाळीस वर्ष माझ्यावर अन्याय झालेला आहे, त्यामुळे आज मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडेंना मी पुढील काळात जशास तसे उत्तर देईन असा इशाराहि पंडितअण्णा मुंडे यांनी आपल्या भाषणातून दिला. गोपीनाथ मुंडेनी जर मला निवडणुकीत परभूत केले तर मी राजकारण सोडून घरात बसेल असेही यावेळेस त्यांनी सांगितले. मी सतत शेतक-यांसाठी लढत आलेलो आहे. इथून पुढेही शेतक-यांच्या फायद्यासाठी मी काम करत राहणार आहे असे त्यांनी परळीच्या जनतेसमोर सांगितले.
मी कोणाचेही घर फोडले नाही - अजित पवार
घराणेशाहीत गैर ते काय? गोपीनाथ मुंडे यांचा बेधडक सवाल!
बाजार समितीतही ‘धनंजय’च!परळीतील चांडाळ चौकडीविरोधात माझे बंड - धनंजय मुंडे