आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyamarathi.com Campaign On Independence Day Maharashtra

राज्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना, तुम्ही पण द्या देशाच्या नावे संदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Divyamarathi.com आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे. वाचकांना १५ ऑगस्ट निमीत्त देशाच्या नावे १५ शब्दात संदेश देण्याची संधी आम्ही देत आहोत. सर्वात छोटे भाषण देण्याचे हे मोठे अभियान आहे. या अभियानाला केवळ सर्वसामान्य वाचकांचेच नाही तर कला, साहित्य, सामाजीक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनीही प्रशंसा केली.
राज्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी Divyamarathi.com कडे आपले संदेश दिले आहेत.
अमर हबीब (ज्‍येष्‍ठ पत्रकार, साहि‍त्यिक)
शेतक-यांच्‍या राज्‍यासाठी लावू पणाला प्राण.
पद्‍मश्री ना. धो. महानोर (ज्येष्ठ कवी)
तरुणाईने पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. पर्यावरण रक्षणासोबत त्याचे जतनही कशा प्रकारे करता येईल, हे आधी शिकून घेणे महत्त्वाचे आहे. झाडे तर आपण लावतोच परंतु, त्यासोबत आपण उत्पन्न देणार्‍या फळ झाडांचीही लागवड केली पाहिजे. यातून आपल्याला उत्पन्न घेता येईल आणि काही प्रमाणात महागाईलाही आळा बसेल.
भीमराव पांचाळे (गझल सम्राट)
'केवळ चर्चा नको, सुरूवात स्वत:पासून करावी'
भ्रष्‍टाचार निर्मूलन, स्त्री भ्रूणहत्या, स्वच्छतेबाबत केवळ चर्चा न करता ते कृतीत आणले पाहिजे. विशेष म्हणजे त्याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. आधी मी केले मग दुसर्‍यास सांगितले, असेच आपले आचरण असायला हवे. तरुणाईने समाजात याविषयी जनजागृती करावी.
दासू वैद्य (गीतकार, साहित्यिक)
देशाबद्दल भव्‍य दिव्‍य घोषणा देण्‍यापेक्षा आपली कर्तव्‍ये, जबाबदा-या पार पाडणे आज महत्‍वाचे आहे.
रां.रा बोराडे (ज्‍येष्‍ठ ग्रामीण साहित्यिक)
वाढता दहशतवाद, वाढता भ्रष्‍टाचार, वाढती महागाई व वाढत्‍या शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या लक्षात घेता भारत हा 'बहू असोत सुंदर, संपन्‍न की महान देश हा' हे केवळ स्‍वप्‍न आहे, असे वाटते.
राजन खान (साहित्यिक)
केवळ माणूस बनलं पाहिजे आणि केवळ भारतीय माणून बनलं पाहिजे.
परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी चित्रपटाचे दिग्दर्शक)
आपण सर्व विज्ञानाचा प्रसार करुया.
सलील कुलकर्णी (गायक-संगीतकार)
ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या मनातही कधी आले नसेल की स्वातंत्र्यानंतर लहान मुले किती असुरक्षित असतील. पुढच्या पिढीच्या चेह-यावर हसू बघायचे असेल, तर आपण त्यांना सुरक्षितता, समाधान आणि विश्वास द्यायला पाहिजे. भारताची परंपरा असेलली संवेदनशीलता त्यांना आपण वारसा हक्कात द्यायला पाहिजे.
संजय नार्वेकर (अभिनेता)
एकजुटीने राहा, निराश होऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आपले भवितव्य उज्ज्वलच आहे.
संतोष जुवेकर (अभिनेता)
ग्लोबल वॉर्मिंगपासून बचाव करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे. पर्यावरण नष्ट होत आहे. पावसाळा असूनही पाऊस पडत नाहीये. तेव्हा १५ ऑगस्ट साजरे करताना निसर्गाची आणि परिसराची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत.
क्रांती रेडकर (अभिनेत्री)
आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. मिळालेल्या स्वातंत्र्याचा सगळ्यांनी आदर करायला पाहिजे. योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सगळ्यांनीच मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावून आपण स्वातंत्र्य एन्जॉय करु शकतो.
जयवंत वाडकर (ज्येष्ठ अभिनेते)
घराघरातून भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे. आपण मुलांना चॉकलेट देऊन हे काम कर असे म्हणतो, सुरुवातीला हे थांबवायला पाहिजे. आपण आपल्या घरातून भ्रष्टाचार संपवला तर पुढच्या वीस वर्षात भारतातील भ्रष्टाचार काही प्रमाणात का होईना कमी होईल. भ्रष्टाचारामुळे आपण पोखरलो गेलो आहोत. हा भ्रष्टाचार कमी झाल्यानंतरच आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो.
चिन्मय उदगीरकर (अभिनेता)
देव, देश आणि धर्मासाठी स्वतःचा प्राण हातात घ्या.
सई ताम्हणकर (अभिनेत्री)
१५ ऑगस्ट हा दिवस साजरा करताना प्रत्येक भारतीयाने पाणी वाचवले पाहिजे. ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण होऊ नये, याकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रा.डॉ. विलास बेत (सामाजिक समस्‍यांचे अभ्‍यासक)
स्‍वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्‍येकाने आपली नागरी कर्तव्‍ये आणि जबाबदा-या वैयक्तिक आयुष्‍यात पाळण्‍यासाठी कटिबद्ध राहूयात.
डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली (ज्‍येष्‍ठ साहित्‍यक)
देहापेक्षा देशावर प्रेम करणे गरजेचे आहे कारण देश असला तरच देहाला अर्थ आहे. भारताच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यात आपला महत्‍वाचा वाटा हवाच ही जाणीव प्रत्‍येकाला असणे गरजेचे आहे. देहापेक्षा देशावर प्रेम करणे गरजेचे आहे कारण देश हा देहापेक्षा अमूल्‍य आहे.
सुभेदार बाबुराव पेठकर (पर्यावरणमित्र)
घराघरातून पर्यावरण सैनिक निर्माण व्‍हावेत. पर्यावरणाला केंद्रबिंदू मानून आपण आपले जीवन व्‍यतीत करावे.
डॉ. उल्हास पाटील (माजी खासदार, गोदावरी फाउंडेशन, जळगाव)
राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसेंच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तरुणाईने गांधीजींच्या तत्त्वांचे सदैव आचरण केले पाहिजे. भारत महासत्ता होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील तरुणाईची शक्ती एकत्र येणे गरजेचे आहे.
मंगल खिंवसरा (सामाजिक कार्यकर्त्‍या)
संविधानाने सगळयांना माणूस म्‍हणून जगण्‍याचे स्‍वातंत्र्य दिले आहे. देशातील भटके, दलित, आदिवासी आणि स्त्रियांना जेव्हा सर्व हक्‍क मिळतील, तेव्‍हा ख-या स्‍वातंत्र्याची संकल्‍पना पूर्ण होईल.
स्वातंत्र्य दिनी अमिताभ यांनी व्यक्त केल्या भावाना, तुम्ही पण द्या देशाच्या नावे संदेश
देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा- राष्ट्रपती