आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Bill In Hike, Costumer Harassment At Aurangabad

ग्राहकांना वीज बिलाचा शॉक लगा, लगा, लगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नागेश्वरवाडीतील व्यावसायिक लक्ष्मीकांत दहिवाल चार दिवसांपासून हवालदिल आहेत. एक कागद त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरला. ते होते जीटीएलने पाठवलेले वीज बिल. एरवी 700 ते 1 हजार रुपयांच्या दरम्यान येणारे बिल या महिन्यात चक्क साडेचार हजार रुपयांचे आल्याने त्यांना खरेच शॉक बसला.
त्यात पुन्हा मागील आणि ताज्या बिलावरील युनिटच्या संख्येत तफावत. हेही कमी म्हणून की काय, बिलावरील छायाचित्रही तिसर्‍याच्याच मीटरचे. त्यांना आता हेलपाटे घातल्याशिवाय हा घोळ निस्तरता येणार नाही. त्यासाठी कामधंदे सोडून जीटीएलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नाकदुर्‍या काढाव्या लागणार आहेत.
ही काही एकमेव घटना नाही. वीज बिलातील गफलतींचा शॉक बसलेले असे शेकडो ग्राहक दरमहा दिसतात. हेलपाटे घालण्यात त्यांचे 8-15 दिवस सहज जातात. औरंगाबादेतील वीज वितरणाचे काम खासगी एजन्सीला दिल्यानंतर कारभारात सुधारणा होईल अशी ग्राहकांची अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही. अंदाजपंचे बिले देणे, मीटर रीडिंगमध्ये घोळ, बिलावर दुसर्‍याच मीटरचे छायाचित्र, बिल वेळेवर न देणे, बिले न देणे असे प्रकार वीज ग्राहकांच्या वाट्याला येत आहेत. बिलात घोळ झाला तर तो निस्तरताना वीज ग्राहकाला दिवस वाया घालवण्याशिवाय पर्यायच नसतो.
या तक्रारींबाबत खूप ओरड झाल्यानंतर जीटीएलने तक्रार निवारण केंद्रे सुरू केली, पण प्रकार काही थांबले नाहीत. या तक्रारींच्या कारणांचा शोध घेतला असता रीडिंग घेणारे आणि बिल वाटप करणारे हे याच्या मुळाशी असल्याचे स्पष्ट होते. मीटर रीडिंगसाठी जीटीएलचे 70 कर्मचारी आणि 7 एजन्सीज काम करतात. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने हे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात बोलताना जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक म्हणाले की, आमचे या कर्मचार्‍यांवर नियंत्रण आणि लक्ष असते.
ग्राहक तक्रार निवारण केंद्रात तक्रार आल्यानंतर त्यांची नोंद होते. सारे संगणकीकृत असल्याने चूक रिपीट झाली तरी ते दिसून येते. त्यामुळे चुकांसंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या जातात. बिलातील चुका कमीत कमी असाव्यात या दृष्टीने जीटीएलने यंत्रणेत अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
न एजन्सीजवर कारवाई
-वीज बिलांचे वाटप न करणे, दिरंगाई करणे आणि असमाधानकारक काम यामुळे आम्ही दोन एजन्सीजचे काम थांबवले आहे. त्यांना यापुढे जीटीएल काम देणार नाही. बिलांबाबतच्या तक्रारी कमी करण्याला प्राधान्य दिले आहे.’’ समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी