आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटमुळे आग; 1 लाखाचे नुकसान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहामांडवा: येथील इंदिरानगर वसाहतीत शनिवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत रोख रकमेसह एक लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य खाक झाले. घरातील सदस्य उकाड्यामुळे अंगणात झोपल्यामुळे बचावले आहेत.
येथील गौतम उत्तमराव बनसोडे घरामध्ये उकाडा जाणवत असल्यामुळे कुटुंवासोबत अंगणात झोपले होते. शनिवारी पहाटे शॉर्टसर्कीट झाल्याने घराला अचानक आग लागली, आग लागल्याचे गौतम यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.
शेजार्‍यांनी लगेचच वायरमनला भ्रमनध्वनी वरून घटनेची माहिती दिल्यानंतर त्याने घरातील वीजपुरवठा खंडित केला.शेजार्‍यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे संसारोपयोगी साहित्य व दागिन्यांसह, टीव्ही,पंखा, धान्य जळाले.
या आगीत बनसोडे कुटुंबीयांचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. लाइनमनच्या दिलेल्या माहितीनुसार दिवसभर उन्हाच्या तीव्रतेमुळे घरावरील पत्रे तापले, पत्र्याला लागून असणारी तार वितळल्यामुळे शॉर्टसर्कीट झाले. नुकसानभरपाईचा पंचनामा करावा व आर्थिक मदत मिळावी अशी मागणी बनसोडे कुटुंबीयांनी केली.