आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन पर्यटन हंगामातच मराठी वेबसाइट बंद

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सध्याचा काळ पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत पर्यटक मोठ्या प्रमाणात सहलीचे बेत आखतात; पण महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या संकेतस्थळाची मराठी आवृत्ती बंद असल्याने पर्यटकांची गैरसोय झाली आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांचे संकेतस्थळ तांत्रिक कारणामुळे बंद असतात. सध्याचा काळ पर्यटन व्यवसायासाठी फायदेशीर आहे. मात्र, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे संकेतस्थळ बंद असल्याने पर्यटकांची अडचण झाली आहे. पर्यटन विभागाच्या www.maharashtraatpurism.gov.inmtdc/ marathiindexthm/ या मराठी संकेतस्थळावर गेले काम सुरू असल्याने वेबसाइट बंद असल्याची सूचना येते. ही दुरुस्ती ऐन पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माहिती मिळेना
प्रत्येक पर्यटकाला पूर्ण माहिती देण्यासाठी मराठी वेबसाइट आहे. वेबसाइटचे काम करताना पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती. एबीएम कंपनीने ही वेबसाइट विकसित केली आहे. दुरुस्ती व सुधारणेसाठी लिंक बंद असली तरी पर्यटन हंगामात तत्काळ काम होणे अपेक्षित होते.
कलाग्राम न्यायाच्या प्रतीक्षेत
गरवारे स्टेडियमजवळ 6 कोटी 42 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या कलाग्रामला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, योग्य प्रसिद्धी झाली नसल्याने महिनाभरातच प्रतिसाद थंडावला आहे. आता नवीन वेबसाइटवर कलाग्रामला स्थान मिळेल, अशी पर्यटकांची अपेक्षा आहे.
आमची निराशा झाली
आमचा 14 जणांचा ग्रुप वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलो होतो. आम्ही एमटीडीसीच्या वेबसाइटवर माहिती घेतली;
पण शहरात आल्यानंतर आणखी ठिकाणे पाहण्यासाठी ही वेबसाइट उघडली तर ती बंद होती. त्यामुळे घोर निराशा झाली.
अभिषेक वायकोस, गोंदिया