आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Takes Action Against Jyoti Maternity Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत ज्योती मॅटर्निटी होममधील 2 सोनोग्राफी मशिन सील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महसूल विभाग आणि महापालिकेतर्फे धडक तपासणी मोहिमेअंतर्गत सुराणानगरमधील ज्योती मॅटर्निटी होममधील दोन सोनोग्राफी मशीन सील करून रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली. दस्तऐवजात अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
सोमवारी 9 तपासणी पथके स्थापन करण्यात आली होती. शहरातील सोनोग्राफी सेंटरवरील कागदपत्रे, गर्भपात अहवाल तसेच इतर माहिती घेतली. यात ज्योती मॅटर्निटी होममध्ये गरोदर महिलांची माहिती असणारे (एफ फार्म) 60 अर्ज आगाऊ भरण्यात आले होते. एका गरोदर मातेच्या गर्भाचा अहवाल चुकीचा दाखवण्यात आला होता. कन्सेट फॉर्मही अपूर्ण आढळून आले. एका मशीनची परवानगी असताना दोन मशीन वापरात होत्या. अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, तहसीलदार विजय राऊत, मनपाच्या डॉ. जयश्री कुलकर्णी, डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. संध्या टाकळीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डॉ. मुंडेची मालमत्ता जप्त होणार
परळी वैजनाथ । बेकायदा गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणातील डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे यांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी परळी न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मंजूर केला. डॉ. मुंडेच्या नावे 67 एकर जमीन, तीन इमारती, दोन प्लॉट, 17 लाख 21 हजारांचे फिक्स डिपॉझिट तर डॉ. सरस्वती मुंडे यांच्या नावे 28 एकर जमीन, एक इमारत, दोन प्लॉट, 29 लाखांचे फिक्स डिपॉझिट अशी मालमत्ता आहे. मुलगा व्यंकटेशच्या नावे 46.38 एकर जमीन, दोन प्लॉट, 1 कोटी 72 लाखांचे फिक्स डिपॉझिट. डॉ. मुंडेच्या नावे नगर बँकेचे साडेपाच लाखांचे, तर व्यंकटेश मुंडेच्या नावे याच बँकेचे 98 लाखांचे कर्जही आहे.