आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वर्षात गाजलेल्या खून खटल्यांच्या निकालाची उत्सुकता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जुन्या वर्षात शहरात गाजलेल्या अनेक चर्चित खटल्यांचे निकाल नव्या वर्षात अपेक्षित आहेत. त्यामुळे या सर्व खटल्यांच्या निकालाकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
मानसी देशपांडे हिचा 12 जून 2009 मध्ये अहिंसानगरात खून करण्यात आला होता. मानसी ही शहरातील अपूर्वा या अपार्टमेंटमध्ये राहत होती.
12 जून 2009 च्या रात्री टिंग-या मोबाइल चोरण्यासाठी मानसीच्या घरामध्ये घुसला होता. या वेळी मोबाइल चोरल्यानंतर टेबलवरील पर्सकडे त्याचे लक्ष गेले. टिंग-याने पर्स चोरण्याच्या प्रयत्नात चिल्लर पैसे खाली पडल्यानंतर झोपलेली मानसी अचानक जागी झाली आणि तिने टिंग-याला पाहून ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु टिंग-याने तिचा गळा दाबला आणि तीक्ष्ण हत्याराने तिचा खून केला.
सुचिता पाटील प्रकरण - हुंड्यासाठी छळ प्रकरणात डॉ. सुचिता पाटील हिला जाळून मारल्याप्रकरणी पती डॉ. नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मयताची सासू शारदाबाई, सासरे बाबूराव, दीर कैलास व जितेंद्र आणि डॉ. नितीन पाटील यांचे मित्र सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुचिता पाटील हिला 1 मे 2010 मध्ये जाळून मारण्यात आले आहे.
राज ठाकरेंचे जामीन प्रकरण - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शासकीय यंत्रणेचे नुकसान केल्याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कन्नडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संजय देवतळे यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात यास आव्हान दिले. जामीन अर्जावर 24 जानेवारीला सुनावणी आहे.
लष्करे खून प्रकरण - नेवासा येथील माजी पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे यांचा छावणी परिसरात मे 2011 मध्ये खून करण्यात आला होता. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणासह इतर महत्त्वाच्या खटल्यांवर यंदाच्या वर्षी निकाल लागणे अपेक्षित आहे.