आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठांतरासाठी आता इ-मेल, एसएमएस, चॅटिंगचा वापर

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परीक्षेत हमखास गुण मिळवण्यासाठी अभ्यास कसा लक्षात ठेवायचा याबाबत विद्यार्थी नवनवीन क्लृप्त्या योजत आहेत. सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असून पाठांतराचा नवीन फंडा दिसत आहे. त्यात नवीन तंत्राचा वापर होत आहे.
अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यासाठी काही विद्यार्थी पहाटे अभ्यास करतात, तर काहीजण रात्री उशिरापर्यंत जागतात. अभ्यासिकेत आणि वर्गात अभ्यास करण्याबरोबरच आता नवीन तंत्राचा वापर होत आहे. मोबाइलमध्ये उत्तरे रेकॉर्ड करून ऐकणे, ऑनलाइन चॅटिंग, इ-मेल, एसएमएस आणि इ-बुक्स या माध्यमांचा त्यात समावेश आहे. भिंतीवर कागद चिकटवून घोकंपट्टी करण्याचे दिवस सरले आहेत, असे चित्र आहे. अभ्यासाच्या या नवीन पद्धतींबद्दल विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या प्रतिक्रिया दिल्या.
ऑनलाईन फंडा
दिवसभर अभ्यास होत नसल्याने रात्री अभ्यास करते. गणिताची सूत्रे लिहून कागदाचे तुकडे जवळ ठेवते. कुठेही गेले तरी कागद उघडायचा आणि वाचन सुरू करायचे.
संगीता जाधव, विद्यार्थिनी, बीएससी
वसतिगृहात घरी असल्यासारख्या काही बाबी आरामात करता येत नाहीत; पण रूममध्ये सारखे फिरत राहते. कपाटावर व दारावर उत्तरांचे मुद्दे लिहून ठेवते. -सुजाता सोनवणे, विद्यार्थिनी, बीए
अभियांत्रिकीचा अभ्यास आकलनावर आधारित असल्याने पहाटे अभ्यास करते. सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी लिहून सराव करते.
- रोहिणी मिसाळ, विद्यार्थिनी, अभियांत्रिकी
एकत्र अभ्यास करण्यावर माझा भर असतो. तसेच इ-बुक्स, इ-मेल आणि एसएमएसचा वापर करते. आधुनिक तंत्राचा वापर करीत असल्याने मुद्दे लक्षात राहतात.
- सरोज शिंदे, विद्यार्थिनी, एमटेक फार्मसी
उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांसोबत ऑनलाइन चॅटिंग करतो. अवघड प्रश्न एकमेकांना आवर्जून विचारतो.
- मोहंमद ताहीर, विद्यार्थी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग