आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी- राष्ट्रवादी काँग्रेस विकासाचं राजकारण करते. विकासाभिमुख राजकारण करण्याची शिकवण शरद पवारांनी आमच्या पक्षाला दिली आहे. त्यामुळे आमचं घर फोडलं, घर फोडलं अशी भावनिक आरोळी फोडणं योग्य नाही. आम्ही दुसरयांची घर फोडायला काही दरोडेखोर आहोत, असा प्रश्न खासदार गोपीनाथ मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या परळी गावात केला. तसेच बीड जिल्हा सहकारी बॅंकेचं वाटोळं कोणी केलं, असा सवालही त्यांनी परळीकरवाशींयाना केला.
परळीत आज गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. त्यावेळी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. धनंजय मुंडे यांनी पिचड व पवार यांचे स्वागत केले.
अजित पवार म्हणाले, आज तरुणांना संधी दिली पाहिजे. त्यांच्या अपेक्षा जाणून घेत काम करायला दिले पाहिजे. ज्यांच्यात कर्तुत्त्व व नेतृत्त्व आहे त्यांना तर दिलीच पाहिजे. नाहीतर काय होते ते तुम्ही पाहिले आहे. तुमची पक्षात घुसमट झाली की स्वाभिमान म्हणून स्वतला बडवून घ्यायचे आणि दुसरयांचे म्हटले की विश्वासघात म्हणायचे. हे थांबले पाहिजे. राष्ट्रवादी हा पक्षच मूळात स्वाभिमानात जन्माला आला आहे. त्यामुळे स्वाभिमान काय असतो ते आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आम्ही स्वाभिमान कार्यकर्त्यांना संधी देत असतो. आम्ही विकासाचं कारण करतो. परळी व बीड जिल्ह्यातही आम्ही यापुढे विकासाचंच राजकारण करणार आहोत. आम्हाला मागच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्हयांना सर्वाधिक यश दिले. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात एकच मंत्री असताना आम्ही बीड जिल्ह्याला दोन मंत्री दिले आहेत. सुरेश धस यांना दूधसंघ दिला आहे. आम्ही सर्वंना एकत्र घेऊन काम करतो. सत्तेचे वाटपही आम्ही सारखेच करतो.
मुंडे यांच्या नेतृत्त्वावर शंका उपस्थित करताना अजित पवार म्हणाले, ज्यांना आपल्याच पक्षात किंमत नाही. त्यांना स्वाभिमान कसला. आपल्याच पक्षातील नेते त्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहेत. कारण ते नेतृत्त्व गुण नसणारया व्यक्तींना राजकारणात सक्रीय करतात. असे सांगत पवार म्हणाले, बीड बॅंकेच कोणी वाटोळं केलं ते आख्या बीड जिल्ह्याला माहित आहे. त्यांनीच केलेला चेअरमन आज तुरुंगात आहे. मग चांगली माणसे निवडता येत नसतील राजकारण कसे करणार. आम्ही जाती-पातीच राजकारण करीत नसून शेतकरी ही एकच जात मानणारे आम्ही आहोत. पिचड यांनीही भाषण केले. पंडितअण्णांनी बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांचे पानीपत करु, अशी आरोळी ठोकली.
परळीतील चांडाळ चौकडीविरोधात माझी प्रामाणिकपणाची लढाई - धनंजय मुंडे
मी कोणाचेही घर फोडले नाही - अजित पवार
घराणेशाहीत गैर ते काय? गोपीनाथ मुंडे यांचा बेधडक सवाल!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.