आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड छावण्या रोखण्याबाबत पोलिस उदासीन..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात मुलींची छेड काढणार्‍या अनेक छावण्या असून त्या उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत नसल्यामुळे रोडरोमिओंचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरात एकूण 13 ठाणी आणि दोन झोन आहेत. 4 महिन्यांपूर्वी एक पथक कार्यान्वित केले होते. मात्र, तेही कुचकामी ठरले आहे. वास्तविक पाहता आयुक्त स्तरावर पथक स्थापन करण्याची गरज आहे. छेड काढल्यानंतर तरुणी तक्रारी द्यायला पुढे येत नाहीत. लेखी तक्रार केल्याशिवाय पोलिसांनाही कारवाई करता येत नाही. छेड काढणार्‍याविरुद्ध 110 किंवा 117 कलमान्वये कारवाई केली जाते. यामध्ये एक हजार रुपये दंड होऊ शकतो.

क्रांती चौकचे पथक सक्रिय..

छेडछाडीचे सर्वाधिक प्रकार क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतात. पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी नुकतीच पथकाची स्थापना केली. पथकप्रमुख म्हणून उपनिरीक्षक शुभांगी देशमुख यांची नियुक्ती केली असून त्यांना तीन महिला कॉन्स्टेबल आणि डी. बी. स्क्वाडचे कर्मचारी सहकार्य करतील. या पथकाने प्रामुख्याने विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय आणि एसबी महाविद्यालय परिसरात लक्ष केंद्रित केले आहे.

तोंडी तक्रार केली तरीही कारवाई

मुलींची छेड काढल्याप्रकरणी आमच्याकडे पथक कार्यान्वित केले आहे. तरुणींची कुणी छेड काढत असल्याचे निदर्शनास आल्यास पथकाकडे तोंडी तक्रार केली तरीही रोडरोमिओविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. ’’ प्रकाश कुलकर्णी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
PHOTOS - रणरागिणी : छेड काढणार्‍यास तरुणीने चपलेने चोपले