आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Bank Of India Credit Card Service For Solider

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसबीआयची जवानांसाठी क्रेडिट कार्ड योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सैन्यातील जवानांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कमी व्याजाची क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जवानांच्या कुटुंबीयांना होणार आहे. तिन्ही सैन्यदलातील जवान व कर्मचार्‍यांसह निमलष्करी दलातील जवानांचे सॅलरी खाते बँकेत आहेत. सर्व सामान्यांसाठी 40 हजारांची र्मयादा आहे. मात्र, जवानांसाठी एक लाखांपर्यंतची र्मयादा दिली आहे.
जवानांना विशेष सवलत
गोल्ड कार्ड व प्लॅटिनम कार्डसाठी सैन्यदलातील कर्मचार्‍यास प्रत्येकी 250 व 500 रुपये प्रतिवर्षासाठी आकारले जातात. सर्वसामान्यांना याच सुविधेसाठी अनुक्रमे 500 व तीन हजार रुपये मोजावे लागतात.
काय आहे सुविधा..
प्रतिमहिना 2500 रुपयांचे बारा हफ्ते खात्यावर जमा करावे. रक्कम दीड वर्षासाठी मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवावी. पहिला हफ्ता भरल्यानंतर एक हजार रुपये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदीची मुभा असते. दुसरा हफ्ता भरल्यानंतर क्रेडिट रक्कमेत वाढ होते. बारा हफ्त्यानंतर 21 हजार रुपये खरेदीची मुभा मिळते. मुदत ठेवीच्या स्वरूपात 25 हजार रुपये जमा होतात. रक्कम 555 दिवसानंतर व्याजासह परत मिळते.
क्रेडिट कार्डवरील रकमेचे 50 दिवसांत व्याज नाही
क्रेडिटच्या रूपाने काढलेली रक्कम 50 दिवसांच्या आत परत केल्यास त्यावर व्याज भरावे लागत नाही. त्यानंतर प्रतिमहिना सामान्यांना शेकडा 3.5 टक्के व्याज भरावे लागते, तर सैनिकांसाठी व्याजाचा दर शेकडा 1.99 रुपये प्रतिमहिना असतो. अशाच प्रकारची मुदत ठेव क्रेडिट कार्ड योजना प्रतिमाह पाच हजार रुपयांची आहे.
रिवॉर्ड पॉइंट
शंभर रुपयांच्या खरेदीवर एक पॉइंट दिला जातो. दोन हजार पॉइंट मिळाल्यानंतर पाचशे रुपये अतिरिक्त खरेदीसाठी मिळतात. पहिला व्यवहार साठ दिवसांत दोन हजार रुपयांची खरेदीचा केल्यास पाचशे रुपये मिळतात.
पेट्रोल सरचार्ज
एकाच वेळी कार्डच्या माध्यमातून पाचशे रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे पेट्रोल खरेदी करणारास 15 रुपयांचा सरचार्ज वाचणार आहे.
पैसे भरण्यासाठी एटीएम
आतापर्यंत पैसे काढण्यासाठी एटीएम सुविधा देण्यात आलेली आहे. आता बँकेने पैसे भरण्यासाठी एटीएम मशीन आणले आहे. मशीन अद्याप कार्यान्वित करण्यात आले नाही. क्रांती चौक शाखेत मराठवाड्यातील पहिले मशीन आले आहे. खाता क्रमांक व पैसे टाकल्यानंतर आता खात्यावर रक्कम जमा होईल. ग्रीन लाइन सुविधा सुरू करूनही बँकेत मोठी गर्दी होत असल्याने ही सुविधा सुरू करावी लागली.