आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Support To Anna And Ramdev On Sunday In Aurangabad

अण्णा, रामदेव बाबांच्या सर्मथनार्थ रविवारी धरणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर बाबा रामदेव आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यांच्या सर्मथनार्थ रामदेव बाबांचा भारत स्वाभिमान न्यास, इंडिया अगेन्स्ट करप्शन, जनांदोलन समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे स्थानिक प्रमुख आनंद गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
वेगवेगळ्या 48 संघटनांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे. देशातील भ्रष्टाचाराला आळा घाळण्याबरोबरच विदेशात दडलेला सुमारे 400 लाख कोटी रुपयांचे काळे पैसे परत आणणे, देशाची व्यवस्था बदलणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. सुटीचा दिवस असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत उदय कहाळेकर, जनांदोलन समितीचे एकनाथ जायभाये, बुद्धप्रिय कबीर उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांमध्ये व्यापारी महासंघ, दीनदयाळ संस्था, राजाबाजार मित्रमंडळ, ब्राrाण महासंघ, तिळवण तेली समाज, आशा इंडस्ट्रीज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, कुमावत समाज, लायन्स इंटरनॅशनल, नारायण सेवा संस्था, हरहर महादेव क्रीडा मंडळ यांचा समावेश आहे.