आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकानेच नेले विद्यार्थिनीला पळवून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सहलीवर आलेल्या नांदेड जिल्ह्यातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीलाच पळवून नेल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. शिवराम संभाजी गौड असे या प्राध्यापकाचे नाव असून या ‘गौड’बंगालाचा गुंता सोडवण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस कामाला लागले आहेत. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील डी फार्मसी महाविद्यालयाची सहल गुरुवारी दुपारी 3 वाजता शहरात आली. यात 11 विद्यार्थिनी आणि 40 विद्यार्थी होते. सोबत 3 प्राध्यापक आले होते. गुरुवारी मकबरा, प्रोझोन मॉल आणि अन्य ठिकाणी भेट दिल्यानंतर ही सहल ज्युबिली पार्क येथील जे. जे. लॉजमध्ये विसावली.
मध्यरात्री प्राध्यापक शिवराम संभाजी गौड (28, रा. बरबडा, नायगाव) हे एका 19 वर्षीय विद्यार्थिनीसह लॉजमधून बेपत्ता झाले. ही घटना सकाळी 6 वाजता उघडकीस आली.
संतोष अंबादास बंचेवार यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात या ‘गौड’बंगालाची नोंद करण्यात आली आहे. प्रा. गौड यांनी एपीआय कॉर्नरवरील बँकेच्या एटीएममधून मध्यरात्री 50 हजार रुपये काढल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.