आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीला कंटाळून पेटवून घेतलेल्या मुलीचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - गुवाहाटी येथे भररस्त्यात तरुणीचे कपडे काढून छेडछाडीच्या लाजिरवाण्या प्रकाराने देश संतप्त झालेला असतानाच मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अल्पवयीन मुलीचा आज (शनिवार) दुपारी मृत्यू झाला.
तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 14 वर्षीय मुलीने रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. 70 टक्के भाजलेली मुलगी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती.
उस्मानाबाद तालुक्यातील गडदेवदरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल झाला. लखन दिलीप आढाव (20) आणि रेशमा नन्नवरे अशी आरोपींची नावे आहेत. लखनने मंगळवारी सायंकाळी तिला चिठ्ठी दिली होती. हा प्रकार गावातील रेशमाने पाहिला. त्यानंतर तिने गावकर्‍यांना ही माहिती दिली. ही बातमी गावभर पसरली. बदनामीमुळे मुलगीही मानसिक तणावाखाली होती. गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास तिने घरात रॉकेल ओतून पेटवून घेतले. राजकीय वरदहस्त असलेला आरोपी दिलीप आढाव गावातून पसार झाला होता. मात्र पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. मात्र दुसरी आरोपी अजूनही फरार आहे. आढावने यापूर्वीही गावातील एका मुलीची छेड काढली होती. या प्रकाराने मुलींची असुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. मुलाहिजा न ठेवता आरोपीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे एसपी सचिन पाटील यांनी म्हटले आहे.
(संग्रहित छायाचित्र)
आता छत्तीसगढ, प्रेमी युगलाला विवस्त्र करुन बनवला MMS
छेड छावण्या रोखण्याबाबत पोलिस उदासीन..
PHOTOS - रणरागिणी : छेड काढणार्‍यास तरुणीने चपलेने चोपले
मुलींची छेड रोखण्यासाठी हेल्पलाइन : सुप्रिया सुळे
गुंडाराज: मुलीची छेड काढल्यावरून उस्मानपुर्‍यात हाणामारी
शिक्षकानेच काढली 23 निरागस विद्यार्थ्यांची छेड