आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीतही ‘धनंजय’च!, परळीत सभापतिपदी पंडितराव मुंडे बिनविरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - परळी नगराध्यक्षपदावरून बंडाचा झेंडा फडकवणारे धनंजय मुंडे यांनी काका खासदार गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा दुसरा धक्का दिला आहे. परळी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार मुंडे गटाने वर्चस्व स्थापित करीत खासदार मुंडे गटाला हबाडा दिला आहे. सभापतिपदी पंडितराव मुंडे यांची, तर उपसभापतिपदी बाबासाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली असून झेडपीचा आखाडा यानिमित्ताने पुन्हा तापणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
मोंढा भागातील बाजार समिती कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची सोमवारी बैठक झाली. बैठकीस पंडितराव मुंडे समर्थक 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे 15 जण उपस्थित होते, तर खासदार मुंडे समर्थक जुगलकिशोर लोहिया, आत्माराम फड आणि काँग्रेसचे संजय दौंड हे तिघे अनुपस्थित होते. सभापतिपदासाठी पंडितराव मुंडे, उपसभापतिपदासाठी बाबासाहेब काळे या दोघांचेच अर्ज आले. दिलेल्या वेळेत इतर कोणाचेही अर्ज न आल्याने मुंडे व काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एम. मोटे, साहाय्यक म्हणून भाग्यश्री मुंडे, सतीश शेरखाने, संतोष भंडारी यांनी काम पाहिले. निवडीनंतर समर्थकांनी दोघांचाही सत्कार केला. शहरातील प्रमुख चौकात आतषबाजी करण्यात आली. पंडितराव मुंडे यांनी 1990 ते 1999 कार्यकाळात सभापतिपद सांभाळले होते.
लेकीसारखं सांभाळूनही प्रज्ञानं घर फोडलं
गोपीनाथरावांची पत्नी प्रज्ञा हिला धाकटी भावजयी म्हणून नव्हे तर लेकीसारखी वागणूक दिली. परंतु गोपीनाथराव आणि आमच्यात फूट पाडून प्रज्ञानेच घर फोडलं.
पंडितअण्णा मुंडे, गोपीनाथरावांचे ज्येष्ठ बंधू
पंडित अण्णा मुंडे यांचा गुरुवारी राष्ट्रवादी प्रवेश
गोपीनाथ मुंडेंच्या वक्तव्यावर पुतण्याचा पलटवार
पक्षासोबत असेल तोच माझा नातेवाईक - गोपीनाथ मुंडे
गोपीनाथ मुंडेंविरोधात पुतण्या धनंजयचा बंडाचा \'पॅटर्न\'