आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान बाबांमुळे वंजारी समाजाची ओळख : मुंडे

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - भगवान बाबांमुळेच वंजारी समाजाची जगात ओळख निर्माण झाली असून समाजाने यापुढील काळात शिक्षित व संघटित होऊन स्वाभिमानाने जगावे, असे भावनिक आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.
औरंगाबाद तालुक्यातील लिंगदरी येथे पंचकुंडी महायज्ञ अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप व भगवान बाबा मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी मुंडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी प्रल्हाद महाराज विघ्ने, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रावसाहेब दानवे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर आदी उपस्थित होते.
भगवान बाबांनी सामान्य माणसाला अज्ञानापासून दूर करण्यासाठी शाळा, वसतिगृहे बांधली. ज्या समाजाला इतिहास, भूगोल नाही अशा समाजाचा इतिहास निर्माण करून सर्वसामान्य माणसांचे कल्याण केले. दिवंगत प्रमोद महाजन यांनी भगवान बाबांचे टपाल तिकीट काढून 667 पोस्टामध्ये पोहोचवले. त्यामुळे भगवान बाबांचे जगात नाव झाले. तोच दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा होता. समाजात गरीब लोक दानशूर आहेत. श्रीमंतांकडे दानत नाही. ऊसतोड मजुरांनी 31 लाख रुपये भगवान गडासाठी दिले. ही स्वाभिमानाची ताकद असून मोडेन पण वाकणार नाही, झुकणार नाही अशा समाजाच्या माणासाने स्वाभिमानाने जगावे, असेही ते म्हणाले. या वेळी लिंगदरी येथील कारभारी वाघ व त्याच्या आईने सुमारे दीड एकर जमीन भगवान बाबांच्या मंदिराला दान दिली.