आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंच्या वक्तव्यावर पुतण्याचा पलटवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड: आता पुण्यतिथीला त्यांना गड आठवायला लागलाय. पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच भगवानगडावरून राजकीय भाष्ये सुरू केली आहेत. आम्ही पक्षाचे एकनिष्ठ पाईक असून, आम्हाला पक्ष संपवायचा नाही. पंडितअण्णांचा वारसा चालवायचा आहे, असा आमदार धनंजय मुंडे यांनी खासदार मुंडेंच्या वक्तव्यावर रोखठोक शब्दांत पलटवार केला.
खासदार मुंडे मंगळवारी भगवानगडावर म्हणाले होते की, सुखाने जगू द्या. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केल्यास घरचा वा बाहेरचा कोणीही असला तरी त्याला संपविल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मी बाप आहे! या संदर्भात आमदार धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत. समाज, जनतेसमोर पंडितअण्णा मुंडे यांचाच वारसा चालवायचा आहे. आम्हाला पक्ष संपवायचा नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, परंतु अपक्ष नगरसेवकांचे भांडवल केलय. इतरत्र गंगाखेडसारखे अकरा ठिकाणी भाजपचा व्हीप डावलून अन्य पक्षाला मतदान केल्याचे त्यांना योग्य वाटते. परळी संदर्भात पक्षाकडून चौकशीचं अद्याप साधं पत्रही आलं नाही. चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. पक्ष कारवाई होत नाही, तोवर आम्ही विनंती करणार. येत्या दोन दिवसांत पक्षाला विचारून निर्णय घेणार आहे.
बेइमानीची व्याख्या कोणती ? ज्यांनी पक्षाचं पाच ते सात वर्षांपासून नुकसानच करावयाचं ठरविलं आहे, ज्या ठिकाणी योग्य उमेदवार निवडून येतात, सहकारी निवडून आणण्याची ताकद ठेवतात, त्यांनाच खासदार मुंडे बेईमान वाटू लागले आहेत. ही बेईमानीची व्याख्या नेमकी कोणती ? असा सवाल आमदार मुंडे यांनी केला.