आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Son Dont Terrorist Comment Bye Abu Hamajas Mother Rahena Begam At Beed. Press Conference

'अटकेतील अबू जिंदाल माझा मुलगा नाही, जबीउद्दीन दहशतवादी असू शकत नाही'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड: 'माझा मुलगा जबीउद्दीन दहशतवाद्यांसारखे काम करू शकत नाही. तो दहशतवादी असूच शकत नाही. त्याला या प्रकरणात फसवले जात आहे', अशी प्रतिक्रिया जबीउद्दीनची आई रहेना बेगम यांनी व्यक्त केली. दिल्ली पोलिसांनी अटक केलेला अबू अन्सारी उर्फ अबू जिंदाल हा जबीउद्दीन नसल्याचेही रेहाना बेगम यांनी सांगितले. पोलिसांनी पकडलेला अबू अन्सारी उर्फ अबू जिंदाल वेगळाच आहे.
रहेना बेगम यांनी गुरुवारी‍ पत्रकार परिषद घेऊन जबीउद्दीनवर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.
2003 मध्ये जबीउद्दीन त्याच्या मित्राच्या बहिणीला वाचविण्यासाठी गेला होता. परंतु पोलिसांनीच त्याला गुन्हेगार ठरवले होते. तो गुन्हेगार नव्हता, असाही खुलासा जबीउद्दीनच्या आईने यावेळी केला.
अबू जिंदाल उर्फ अबू अन्सारीला अटक केल्यापासून पोलिस सारखे आमच्या घरी येत होते. विचारपूस करत होते. परंतु आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. सध्या जबीउद्दीनच्या वडिलांची प्रकृती ठिक नसल्यामुळे आम्ही जबीउद्दीनच्या नानीच्या घरी आलो आहे. जबीउद्दीनच्या नानीचे घर बीडमध्येच आहे. आम्ही बीड सोडून कुठेही गेलो नाही, असेही रेहाना बेगम यांनी पत्रकारांना सांगितले.
जबीउद्दीनने आम्हाला 50 लाख रूपये पाठविल्याची माहिती खोटी असल्याचे रहेना बेगम यांनी सांगितले. विशेष म्हणजे जबीउद्दीनची डीएनए टेस्टही झालेली नाही, असेही रेहाना बेगम म्हणाल्या.
दरम्यान, मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याच्या आरोपाखाली जबीउद्दीन उर्फ अबू अन्सारी उर्फ अबू जिंदाल याला सोमवारी पोलिसांनी दिल्ली‍तील आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर अटक केली होती. मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा जबीउद्दीनला उर्फ अबू हमजावर आरोप आहे.
9/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होता अबू हमजा
चोराच्या उलट्या बोंबा: अबू हमजा आणि पाकिस्‍तानचा काही संबंध नाही- मलिक
अबू जिंदालचे कुटुंबिय बीडमधुन बेपत्ता, घराला कुलुप ठोकून पसार