आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची छेड रोखण्यासाठी हेल्पलाइन : सुप्रिया सुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- स्त्री भ्रूणहत्या, हुंडाप्रथा आणि शाळा-महाविद्यालयांतील मुलींची छेडछाड रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी राजेश टोपे यांनी हेल्पलाइन सुरू केली असून, 103 नंबर डायल केल्यास मुलींच्या छेडछाडीसंदर्भात कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे आयोजित युवती मेळाव्यात केले.
हिंगोली येथील विशाल मंगल कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय राष्‍ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार विलास गुंडेवार, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, महिला आघाडीच्या रत्नमाला शिंदे, रामराव वडकुते आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी सूर्यकांता पाटील यांनीही युवतींना मार्गदर्शन केले.