आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरात अभूतपूर्व गर्दी, विलासरांचे पार्थिव लातूरात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बाभळगाव येथील त्यांच्या घराजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. विलासरावांचे आमदार पूत्र अमितसह दोघांनी मुखाग्नी दिला.
पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासरावांचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्यपाल के. शंकरनारायण यांनीही विलासराव यांना श्रद्धांजली वाहिली.
विलासरावांचे पार्थिव बुधवारी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने लातूरला आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव बाभळगाव येथील दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे त्यांची पत्नी वैशालीताई, पुत्र अमित, रितेश, धीरज तसेच आमदार दिलीपराव देशमुख उपस्थित होते.
विलासरावांचे मित्र आणि सहकारी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कृषिमंत्री शरद पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक
गेहलोत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी, विलासरावांचे मित्र गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
त्याआधी लातूरच्या मुख्य चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर बाभळगावकडे नेण्यात आले. लातूर ते बाभळगाव या प्रवासासाठी प्रचंड गर्दीमुळे तब्बल अडीच तास लागले. त्यामुळे नियोजित कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आला, बाभळगाव येथील दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्याआधी त्यांच्या घरी नेण्यात आले तिथे कुटूंबीय आणि मोजक्या नातेवाईकांसह काही विधी पार पाडण्यात आले. त्यानंतर पार्थिव दयानंद विद्यालयात आणण्यात आले. दयानंद विद्यालयात अत्यंदर्शनासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आमदार बाळा नांदगावकर, सरपोतदार यांनी विलासरावांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक, कलाकारही उपस्थित झाले होते.
यांनी घेतले अंत्यदर्शन
उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, निर्माता करण जोहर, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, रिपाई नेते रामदास आठवले, अभिनेता विवेक ओबेरॉय.
विमानतळापासून लातूरच्या मुख्य चौकाकडे त्यांचे पार्थिव नेत असताना रस्त्याच्या दुतर्फा लोकांची अलोट गर्दी झाली होती. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, लातूर आणि बाभळगावमध्ये तीन-चार लाखाहून अधिक लोक उपस्थित राहिले असण्याची शक्यता आहे. विलासरावांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बाभळगाव (जि. लातूर) या मूळ गावी घराशेजारील बागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
PHOTOS: अमोघ वक्तृत्वाची देण लाभलेले विलासराव...
असा होता बाभळगावच्या सरपंचाचा दिल्लीपर्यंतचा प्रवास!
मुख्यमंत्री असताना विलासरावांनी दिले 'या' संकटांना तोंड
विलासराव, महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री- मधुकर भावे
विलासराव, माझे राजकीय प्रमोटर- अशोक चव्हाण
विलासराव एक शाब्दिक ‘कोट्या’धीश- राजीव खांडेकर