आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भपात करताना बीडमध्‍ये महिलेचा मृत्‍यू, 'लेक लाडकी' अभियानाचा फज्‍जा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडः गर्भपात करीत असतानाच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ज्या डॉक्टरवर गर्भलिंग निदानाप्रकरणी कारवाई झाली होती त्याच डॉक्‍टरच्‍या रुग्‍णालयात हा प्रकार घडला आहे. डॉ. सुदाम मुंडेच्या असे या डॉक्‍टरचे नाव आहे. विजयमाला व्हटेकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला धारुर तालुक्यातल्या भोपा गावातली होती. या महिलेल्या याआधी ४ मुली होत्या. त्यामुळे ती गर्भपात करुन घेण्यासाठी सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. या सर्व प्रकरणातली धक्कादायक म्‍हणजे, या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दिली नाही. परंतु, पोलिसांनीच या प्रकरणी गुन्हा दखल केला.
सुदाम मुंडे यांच्यावर याआधी गर्भलिंग परिक्षणाप्रकरणी कारवाई करून त्यांचा परवाना रद्द केला होता. असे असताना हा प्रकार उघड झाल्याने बीडमध्ये संताप वक्त होत आहे. गतवर्षी ‘लेक लाडकी’ या अभियानाच्या माध्यमातून सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची चोरी उघड झाली होती.