आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Terrorist Attacks Have A Local Connection Check

मालेगाव ब्लास्टमध्ये जबीउद्दीनचा हात; हिंदूत्त्वादी संघटनेचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सनातन संस्थेवर निर्बंध लावण्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी होत असताना हिंदू विचारसरणीच्या काही लोकांनी गोव्यात 'राष्ट्रीय हिंदू विधिज्ज्ञ परिषदे'ची स्थापना केली आहे. 2008 मध्ये मालेगावात झालेल्या ब्लास्टमध्ये जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजाचा हात असल्याचा आरोप या परिषदेत करण्‍यात आला.
मालेगाव ब्लास्ट प्रकरणी एटीएसने साध्वी प्रज्ञा सिंहसह हिंदूत्त्ववादी लोकांना विनाकारण आरोपी केले आहे. हिंदूवादी संघटनेच्या लोकांना अटक करण्यासाठी 'इंडियाबुल्स कंपनी'च्या विमानाचा वापर करण्‍यात आला होता.
या प्रकरणात या विमान कंपनीने एटीएसची मदत का केली असावी असाही प्रश्न उपस्थित यावेळी उपस्थित करण्‍यात आला. या प्रकरणाची पुन्हा सखोल व्हावी, तसेच राहूल भट्‍ट आणि हेडली यांच्या संबंधांची चौकशी होणेही गरजेचे असल्याचे परिषदेचे सचिव संजीव पुनालेकर गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जबीउद्दीनच्या अटकेनंतर मालेगावसह मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात 'लोकल कनेक्शन' असल्याचे स्पष्‍ट झाले आहे. कारण जबीउद्दीन हा महाराष्‍ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात मालेगाव, बीड, परभणी, पुणे, सांगली आणि औरंगाबाद येथील विशिष्ट समुदायातील लोकांचा हात असल्याचा सनसनीखेज आरोपही 'राष्ट्रीय हिंदू विधिज्ज्ञ परिषदे'ने केला आहे.
2008 मध्ये मालेगाव येथे झालेला ब्लास्ट आणि मुंबईत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्या बाबतची खरी माहिती एटीएस लपवित असल्याचा आरोप पुनालेकर यांनी केला. 26/11च्या हल्ल्यादरम्यान कामा रूग्णालयात दहशतवादी मराठी बोलत होते, असेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. जबीउद्दीन हा महाराष्‍ट्‍ातील असल्याने तो अस्खलित मराठी बोलतो. यावरून या हल्ल्यातील तोच मास्टर माईंड असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडण्यात आलेला अजमल कसाबचे नऊ साथीदारांचा खात्मा करण्‍यात आला होता. त्यांना गुपचूप दफन करून टाकण्यात आले होते. त्यावरही पुनालेकर यांनी संशय व्यक्त केला. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले ही उचलली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी‍ केला.
काय आहे... 'राष्‍ट्रीय हिंदू विधिज्ज्ञ परि‍षद':
'राष्‍ट्रीय हिंदू विधिज्ज्ञ परि‍षदे'ची स्थापना गोव्यात गेल्या 15 जून रोजी झाली. मधुसुधन कुलकर्णी या परिषदेचे अध्यक्ष असून संजीव पुनालेकर हे सचिव आहे. या परिषदेत बहुतांश हिंदू वक‍िल आणि सेवा निवृत्त न्यायाशीश आहेत.
बीड फॉर बॅड न्यूज : अफू, स्त्रीभ्रूणहत्या, दहशतवाद आणि ...
जबीउद्दीन अन्सारीच्या ओळखीबाबत संशय ; डीएनए चाचणीवरही सवाल!
'अटकेतील अबू जिंदाल माझा मुलगा नाही, जबीउद्दीन दहशतवादी असू शकत नाही'
9/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होता अबू हमजा