आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आदर्श'ची फाईल सुरक्षित, अनेक महत्त्वाच्या फाईल्सचा कोळसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याच्या मंत्रालयाला दुपारी २.४०च्या सुमारास आग लागली, त्यानंतर आता तीन तासानंतरही ही आग आटोक्यात आणण्यात आपत्कालिन व्यवस्थेला यश आलेले नाही. या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. मात्र, राज्यात गाजत असलेला आणि अनेक मुख्यमंत्री ज्या घोटाळ्यात गुंतलेले आहेत अशा आदर्श सोसायटी घोटाळ्याची कागदपत्रे सुरक्षित असल्याचा दावा मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांनी केला आहे.
अपत्कालिन व्यवस्थेचे तीन तेरा
राज्याची सर्वात महत्त्वाची इमारत असलेल्या मंत्रालयातील अपत्कालिन व्यकस्था निष्क्रीय असल्याचे समोर आले. आग लागल्यानंतर धोक्याचा इशारा देणारे सायरन सुरु नव्हते. तसेच आग आटोक्यात आणणारी यंत्रणा कार्यन्वित नव्हती. दुपारी २.४०च्या सुमारास आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाची पहिली गाडी ३.०५ मिनीटांनी दाखल झाली.
आगीत काय काय जळाले
मंत्रालयाच्या चौथ्या, पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे दालन असलेल्या सहाव्या माळ्याला आगीने विळखा टाकला आहे. त्यात युएलसी घोटाळ्याची महत्त्वाची कागदपत्रे, जमीन वाटपासंदर्भातील महत्त्वाच्या फाईल, महसूल खात्याच्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स, अनेक महत्त्वाच्या चौकशी समित्यांचे अहवाल जळून खाक झाले आहेत. राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या अंतर्गत चौकशीचे अहवालही मंत्रालयात होते त्यांचीही या आगीत राख झाली असल्याची शक्यत वर्तवली जात आहे. राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवासाचीही फाईल जळाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
हे विभाग आगीच्या विळख्यात
मुख्यमंत्री कार्यालय
उपमुख्यमंत्री कार्यालय
मुख्य सचिवांचे कार्यालय
महसुल विभाग
नगरविकास विभाग
सहकार विभाग
आदिवासी विकास विभाग
शालेय शिक्षण विभाग
गृहनिर्माण राज्यमंत्रालयाचे कार्यालय
VIDEO : मंत्रालयाला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे खाक
LIVE: मंत्रालयात आगीचे तांडव; मुख्यमंत्री कार्यालय जळून खाक, पाच जखमी