आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय देओलचा गर्लफ्रेंड प्रीती देसाईसोबत चित्रपट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हट के भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारा अभिनेता अभय देओल लवकरच त्याची गर्लफ्रेंड प्रीती देसाईसोबत पहिल्या चित्रपटात झळकणार आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल ‘ब्र’देखील न उच्चारणा-या अभयनेच ही बातमी दिली आहे.
‘शादी आॅफ द डेड’ असे या चित्रपटाचे नाव असून गर्लफ्रेंडसोबत काम करणार असल्यामुळे अभय भलताच आनंदी आहे. तो म्हणाला की, मी शिफारस केली, म्हणून प्रीतीला या चित्रपटात भूमिका मिळाली असे नाही. मी करत असलेल्या चित्रपटांच्या पटकथा तिला मी नेहमीच वाचायला देतो. प्रीतीने नवदीप सिंगदिग्दर्शित ‘मनोरमा अंडर सिक्स फीट’ हा चित्रपट पाहिला होता. तिला तो आवडला. तसेच ‘शादी ऑफ द डेड’सुद्धा नवदीपच दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर तिला त्यातील एक भूमिका फारच आवडली. आपण त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो, असा विश्वास तिला वाटला. त्याच विश्वासातून या चित्रपटात काम करण्यास तिने होकार दिला. त्या निमित्ताने मुख्य भूमिकेत पहिल्यांदाच तिचे पदार्पण होत आहे.
प्रीती दर्जेदार अभिनेत्री...- ‘शोर इन द सिटी’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात तिने छोटेखानी भूमिका करून आपल्या अभिनयकौशल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे आपल्या आगामी चित्रपटात जरी ती मुख्य भूमिका करत असली, तरी तिला अभिनयाचा प्रांत नवा नाही. उलट ती अतिशय आत्मविश्वासाने कॅमे-यासमोर जाते. त्यामुळे या चित्रपटाच्या बाबत कुठली अडचण उद्भवणार नाही असे अभयने सांगितले. लग्न केव्हा करणार, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मात्र त्याने टाळले.