आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Laila Khan Murder Case Criminal Parvez Tak Arrested

लैलाच्या आईचे अनेक पुरुषांशी संबंध; क्राइम ब्रॅन्चच्या हाती ठोस पुरावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सकृतदर्शनी मिळालेल्या पुराव्यांनुसार इगतपुरीजवळील फार्महाऊसवर मंगळवारी सापडलेले सहा मानवी सांगाडे हे अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांचे असल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रॅचचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी बुधवार पत्रकारांना दिली. याबाबत डीएनए चाचणीनंतरच नेमकेपणाने बोलता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लैलाचा सावत्र पिता परवेझ टाक याने तिच्यासह कुटुंबियांची हत्या केल्याचे कबुली जबाबात म्हटले आहे. लैला खानसह तिची आई सेलिना पटेल, भाऊ इम्रान, बहीण आफ्रिन तसेच झारा व त्यांची नातेवाईक रशिदा खान यांची हत्या करण्यात आली आहे. परवेझ हा लैलाची आई सेलिना पटेलचा तिसरा नवरा होता. सेलिना आणि परवेझ यांच्यात नेहमी वाद होत होते. तसेच से‍लिना तिचा आधीचा पती आसिफ शेख याच्या संपर्कात होती आणि तेच परवेझला खटकत होते. या वादातून परवेझने सेलिना, लैलासह इतर कुटुंबियांची हत्या केली असावी, असा संशय रॉय यांनी व्यक्त केला. हत्या करताना लैला खान हिने परवेझला पाहिले होते. त्यामुळे लैलाचाही काटा परवेझ याने काढला, असेही रॉय यांनी यावेळी सांगितले.
फार्महाऊस परिसरात सापडलेले सहा मानवी सांगडे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. डीएनए चाचणीत सगळ्यांची ओळख पटवली जाणार असल्याचे रॉय यांनी स्पष्ट केले. प्राथमिक तपासात पाच मृतदेह स्त्रियांचे असून, एक पुरुषाचा असल्याचा आढळून आले. परवेझ टाक याने फार्महाऊसवर सर्वात पहिल्यांदा पत्नी सेलिनाचा खून केला. त्यानंतर त्याने फार्महाऊसवर असलेल्या अन्य कुटुंबियांचा काटा काढला. यासाठी त्याने शाकीर हुसेन याचीही मदत घेतली. सर्वांचे मृतदेह त्याने बंगल्याच्या मागील सेफ्टी टॅंकजवळ १२ बाय ८ फुटांचा खड्डा खणून त्यामध्ये पुरून टाकले. सहा फूट खोल असलेल्या या खड्ड्यात सुरुवातीला तीन मृतदेह पुरण्यात आले. नंतर त्याच्यावर शहाबादी फरशांचा थर रचण्यात आला आणि त्यावर पुन्हा तीन मृतदेह पुरण्यात आले. हत्येसाठी वापरलेले साहित्यही याच खड्डयात पुरण्यात आले. हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी परवेझ टाकने घरातील जनरेटरमधून डिझेल काढून त्याच्या साह्याने घराला आग लावून दिली, अशीही माहिती रॉय यांनी दिली.
क्राईम ब्रॅंचचे पोलिस या प्रकरणी अजून तपास करीत आहेत. सलिनाचा दुसरा पती आसिफ शेख याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. परवेझ टाक याच्याशी विवाह झाल्यानंतरही सेलिना आसिफ शेखच्या संपर्कात होती. त्यांच्या मीरा रोड येथील घराच्या चाव्याही आसिफ शेखकडे होत्या. याबद्दलही परवेझ टाकला राग होता, असे त्यांनी सांगितले.
तीन जुलैला हे प्रकरणी क्राईम ब्रॅंचकडे सोपविण्यात आल्यानंतर परवेझला जम्मू काश्मीरहून मुंबईला आणण्यात आले होते. त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिल्यावर मुंबई क्राइम ब्रॅँच आणि एटीएसच्या पथकाने मंगळवारी त्याला इगतपुरीतील फार्म हाऊसवर आणले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी खोदकाम सुरू केले होते. तिथेच त्यांना सहा मानवी सांगाडे सापडले होते. सात दिवसांत या प्रकरणाचा तपास करून उलगडा केल्याबद्दल त्यांनी क्राईम ब्रॅंचमधील सहकारी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
PHOTOS : उलगडले लैलाच्या खुनाचे रहस्य...
गूढ उकलले : लैलाच्या बंगल्यात सापडले सहा मानवी सांगाडे
लैला खान हत्याकांड : इगतपुरीतील दोन ड्रायव्हर ताब्यात
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर
EXCLUSIVE : दाऊदच्या इशा-यांवर नाचत आहे बॉलिवूड अभ‍िनेत्री लैला