आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Laila Khan's Husband Vaffi Khan Arrested At Mumbai Airport

अभ‍िनेत्री लैला खानचा पती वफी खानला मुंबई एअरपोर्टवर अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई क्राइम ब्रॅंचच्या अधिकार्‍यांनी अभिनेत्री लैला खानचा पती सोनू उर्फ वफी खानला मुंबई एअरपोर्टवर अटक केली. वफी खान दुबईहून भारतात आला होता. एअरपोर्टवर उतरताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे अभिनेत्री‍ लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्याकांडाला पुन्हा वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सोनू खान हा दुबईतील एनआरआय कमल जधवानी यांचा मुलगा आहे. त्याने धर्म बदलून लैला खानशी निकाह केला होता. त्यानंतर तो सो‍नूचा वफी खान बनला होता. लैला खान आणि तिच्या कुटुंबिंयाच्या हत्याकांडात त्याचा हात आहे की नाही, याचा तपास क्राइम ब्रॅचचे अधिकारी करीत आहे.
पोलिससूत्रांनुसार, 9 फेब्रुवारी 2011 रोजी रात्री इगतपुरीजवळील उंटदरीतील फार्म हाऊसवर लैलासह तिच्या कुटुंबातील सदस्य जमले होते. सगळ्यांनी घरात म्युझिकच्या तालावर नाच केला होता. जंगलात असलेल्या फार्महाऊसमध्ये चार तास नाचगाणे सुरू होते. परंतु त्यानंतर मात्र तेथे स्मशान शांतता पसरली होती. परवेझ टाकसह त्याच्या सहकार्‍याने लैलासह तिच्या कुटूंबियांचा खात्मा केला.
फार्महाऊसवर सापडलेले सांगाडे लैला आणि तिच्या कुटुंबियांचे: हिमांशू रॉय
लैला खान हत्याकांड : इगतपुरीतील दोन ड्रायव्हर ताब्यात
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर