आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Land Issue And State Government Of Maharashtra

सरकारला जागा देण्यास एअर इंडियाचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालयाला आग लागल्यानंतर पर्यायी जागा मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारतीत मिळावी म्हणून राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले होते, परंतु एअर इंडियाच्या इस्टेट मॅनेजरने ताकास तूर लागू न दिल्याने राज्य सरकारचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे समजते. आता मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया पुन्हा एकदा एअर इंडियाची जागा मिळावी म्हणून प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रालयाच्या आगीत तीन मजले जळून खाक झाल्याने अनेक विभागांचे काम ठप्प झाले. हे सर्व विभाग एकाच इमारतीत हलवावेत असा विचार उच्च स्तरावर करण्यात आला. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, तीन-चार ठिकाणी विभाग हलवण्यापेक्षा एकाच इमारतीत सर्व विभाग हलवले तर ते कामकाजाच्या दृष्टीने अधिक चांगले ठरेल. मंत्रालयाजवळील एअर इंडियाच्या इमारतीत मोकळी जागा असल्याने तेथे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार एअर इंडियाच्या व्यवस्थापकांशी बोलणी करण्यात आली. मात्र, त्यांनी केवळ हो-हो म्हणत वेळ मारून नेला. त्यामुळेच पर्यायी जागा शोधून तेथे कार्यालये हलवण्यात आली.
याबाबत मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, एअर इंडिया इमारत मंत्रालयापासून जवळ असल्याने आणि तेथील जागेसाठी प्रयत्न सुरू होता. मात्र, काही कारणामुळे बोलणी यशस्वी होऊ शकली नाही. याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाºयांशीही चर्चा झाली. त्यांनी जागा देण्यास होकार दिला होता. मुंबईतील एअर इंडिया इमारतीच्या इस्टेट मॅनेजरशी आम्ही अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते चर्चेला आलेच नाहीत. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही बांठिया यांनी सांगितले. एमटीएनएलने त्यांच्याकडील जागा दिल्याने आमची समस्या कमी झाली आहे तरीही एअर इंडियातील जागेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.