आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्‍या वादाला धर्माचा रंग चढविणा-या लालुंवर बाळासाहेब बरसले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आयपीएलसामन्‍यानंतर वानखेडे स्‍टेडियमवर धिंगाणा घालणा-या शाहरुखची 'मुसलमान' म्‍हणून पाठराखण केल्‍यावरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लालू प्रसाद यादव यांच्‍यावर तोफ डागली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्‍ये लिहिलेल्‍या लेखातून बाळासाहेबांनी लालुंवर टीका करताना म्‍हटले आहे की, आयपीएलमध्‍ये शाहरुख खानच्‍या वादाला धर्माचा रंग देऊन लालुंनी विष ओकले आहे. हा प्रकार म्‍हणजे लालुंचे नवे शरसंधान आहे. उद्धव ठाकरे यांनीही टीका करताना शाहरुखच्‍या मस्‍तीमुळे आयपीएल बदनाम होत असल्‍याचे म्‍हटले होते. तर मनसेने शाहरुखला मराठी शिकण्‍याचा सल्‍ला दिला होता. मुस्लिम असल्‍यामुळे शाहरुख खानला त्रास देण्‍यात येतो, असे वक्तव्‍य लालुंनी केले होते.
आयपीएल म्‍हणजे क्रिकेट, कॅश आणि कॉन्‍ट्रोव्‍हर्सीचा कॉकटेल. परंतु, यावेळी त्‍यावर लव्‍ह, सेक्‍स आणि धोका वरचढ ठरताना दिसत आहे. या मसाल्‍याला आज आणखी एक झणझणीत तडका बसला तो म्‍हणजे रेव्‍ह पार्टीचा. मुंबईत एका रेव्‍ह पार्टीत आयपीएलमध्‍ये खेळणा-या दोन खेळाडुंना ताब्‍यात घेण्‍यात आले तर चौघे पळाले. आयपीएल पार्ट्या तसेच सामन्‍यादरम्‍यान मैदानावर मद्यपान करण्‍याचा प्रकार तर सर्रास होतो. परंतु, गेल्‍या आठवड्यात एका अमेरिकन युवतीचा खेळाडुकडून विनयभंग केल्‍याच्‍या आरोपांनी खळबळ उडाली.
हा प्रकार क्रिकेटप्रेमींसाठी निश्चितच धोकाच आहे. परंतु, खेळाडू आणि फ्रेंचायझी मालकांचे केवळ पैसा आणि मस्‍तीवरच प्रेम दिसते. यंदाच्‍या हंगामात आयपीएलचा टीआरपी घटला. परंतु, वेगवेगळ्या वादांमुळे आयपीएल चर्चेत राहिले आहे. या वादांच्‍या चर्चेतच आयपीएल स्‍पर्धा आता अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. दिल्‍ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्‍नई हे संघ प्‍ले ऑफ फेरीत दाखल झाले आहे. परंतु, चेन्‍नई वगळता इतर तीन संघ यंदा सातत्‍याने वादाच्‍या भोव-यात अडकले आहेत.
आयपीएलमध्‍ये सुरु असलेल्‍या या सावळ्या गोंधळावरुन संसदेतही गदारोळ झाला. आयपीएलवर बंदी घालण्‍याची मागणी आता खासदारांकडून होत आहे.
वादावर शाहरुखने उघडले तोंड, त्यांनीच माझी माफी मागावी (फोटो फिचर)