आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackerey Reacts Agressively To Petrol Price Hike

पेट्रोल दरवाढीविरोधात देशभर वणवा पेटवाः बाळासाहेब गरजले, भाजपवरही टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः पेट्रोल दरवाढीवरुन सर्वसामान्‍य जनतेच्‍या भावनांचा उद्रेक होत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही कडाडले आहेत. सर्वसामान्‍य जनतेने एकत्र येऊन एकीच्‍या वज्रमुठीचा प्रहार कॉंग्रेसवर करण्‍याची वेळ आली आहे, अशी टीका बाळासाहेबांनी 'सामना'मधील अग्रलेखातून केली आहे.
कॉंग्रेसवर हल्‍लाबोल करतानाच बाळासाहेबांनी भाजपवरही टीका केली आहे. सामना'मध्‍ये लिहीले आहे की, कॉंग्रेसने सर्वप्रथम 'ऑल ईज वेल'चा संकेत दिला. त्‍यानंतर लगेचच पेट्रोलचे दर वाढविले. आता सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महागाईविरोधात संपूर्ण देशात वणवा पेटविला पाहिजे.
भाजपवर टीका करताना बाळासाहेब म्‍हणतात, सर्वांना एकतेचा उपदेशा देणा-या भाजपमध्‍ये सध्‍या मतभेद दिसून येत आहेत. याची प्रचिती कार्यकारिणीच्‍या बैठकीत आली. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांना खुष करण्‍यासाठी वरिष्‍ठ नेते संजय जोशी यांचा बळी दिल्‍यावरुन बाळासाहेबांनी नाराजी व्‍यक्त केली.
शाहरुखच्‍या वादाला धर्माचा रंग चढविणा-या लालुंवर बाळासाहेब बरसले
राजच्या डोक्यात नेतागिरी गेली; शिवसेनाप्रमुखांचा मनसे अध्यक्षांना टोला