आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp Mla And Oppsition Leader Eknath Khadse Dispute

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप आमदार विरोधीपक्ष नेते खडसेंवर नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसच्या आमदारांच्या पाठोपाठ आता भाजपचे आमदारही विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यावर नाराज असून आपल्याला विधानसभेमध्ये बोलायला दिले जात नाही, अशी तक्रार आता ते उघडपणे करू लागले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा एक आठवडा होऊनही विरोधी पक्षाने सरकारला कोंडीत पकडण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे आता दुसºया आठवड्याला सुरुवात झाल्यानंतर काहीच घडत नसल्याचा सूर भाजपच्या आमदारांमध्ये उमटत आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये मंत्रालयाला लागलेली आग हा मोठा विषय होता. पण त्या संबंधित विविध विषयांवर बोलण्याऐवजी केवळ आगीबद्दल संशय निर्माण करणारे भाषण खडसे यांनी केले. पक्षाच्या इतर नेत्यांनाही फारसे बोलू दिले नाही. त्यानंतर लगेचच कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा उपस्थित करण्यात आली. त्यामध्येही अनेक विषयांना बाजूला ठेवण्यात आले.
तसेच ठाम भूमिका घेण्याऐवजी केवळ वृत्तपत्रांच्या कात्रणातून वाचून दाखवल्याप्रमाणे खडसे यांनी भाषण केल्याची प्रतिक्रिया एका आमदाराने दिली. भाजपच्या एका अभ्यासू आमदाराला मंत्र्यांवर फार आरोप करू नयेत, अशा सूचना आधीच देण्यात आल्या होत्या, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ठरवलेल्या विषयांपैकी फारच थोडे विषय प्रत्यक्षात उपस्थित करण्यात आल्याची तक्रार आणखी एका आमदाराने केली.
अकार्यक्षम सरकारचा पर्दाफाश करणार- एकनाथ खडसे
वीज खरेदीत 30 हजार कोटींचा अपहार - एकनाथ खडसे
सत्ताधा-यांना लावणीला जाण्याची घाई : एकनाथ खडसे
तुमच्यापेक्षा अशोक चव्हाण बरे होते - एकनाथ खडसे