आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp State President Sudhir Mungantiwar At Mumbai

धनंजय मुंडेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा - मुनगंटीवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे हे सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांना राष्ट्रवादीत जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे, पण आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशा स्पष्ट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार मंगळवारी मुंबईत सांगितले.
राजकारणात कुणीही कुणाला बांधून ठेवत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडताना ते पक्षात असताना त्यांना प्राप्त झालेली पदे आधी सोडावी. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खुशाल राष्ट्रवादीत जावं, असे मुनगंटीवार यांनी स्पष्‍ट केलं. धनंजय मुंडे यांच्या बंडखोरी मागे राष्ट्रवादीची फूस असल्याचा आरोपही मुनगंटीवार यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडेंवर अहवालानंतर कारवाई होणार