आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cinema Sensor Board President Pankaja Thakur Agree To Marathi Member

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचे मराठी चित्रपट महामंडळाला आश्वासन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मराठी सिनेमाला अधिकृत प्रमाणपत्र देणार्‍या सेन्सॉर बोर्डावर एकही मराठी व्यक्ती नसल्याने संताप व्यक्त करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोर्डाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर जागे झालेल्या मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतेच याच मागणीचा पुनरुच्चार करत एक निवेदन बोर्डाकडे सादर केले. दरम्यान, लवकरच मराठी सदस्य नेमला जाईल, असे आश्वासन बोर्डाच्या अध्यक्षा पंकजा ठाकूर यांनी शिष्टमंडळाला दिले.
मराठी चित्रपट निर्मात्यांना दिली जाणारी नियमावली मराठी भाषेतच असावी. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात विलंब केला जातो. मराठी चित्रपटातील केवळ एका दृश्यामुळेही त्याला ‘अ’ प्रमाणपत्र दिले जाते. सेन्सॉर बोर्ड मराठी आणि हिंदी चित्रपटांत भेदभाव करत असल्याची उदाहरणे या निवेदनात देण्यात आली आहेत.
मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सेन्सॉर बोर्डाच्या मुख्याधिकारी पंकजा ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर येत्या 8 ते 15 दिवसांत सेन्सॉर बोर्डावर मराठी माणसाची सदस्य म्हणून नेमणूक करण्याचे तसेच मराठी चित्रपटाचा अर्ज आल्यापासून आठवडाभरातच सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन पंकजा ठाकूर यांनी दिले.