आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Nagnath Kottapale Appointed As As Language Consultancy Committee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी डॉ. कोत्तापल्ले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची नियुक्ती सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने ही समिती स्थापन केली आहे. पायाभूत सुविधा, निधी, कर्मचारी राज्य शासनाने उपलब्ध न करून दिल्याचा आरोप करत माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. डॉ. कोत्तापल्ले यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख व जून 2005 ते जून 2010 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद कोतापल्ले यांनी भूषविले आहे.