आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधा-यांना लावणीला जाण्याची घाई : एकनाथ खडसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्थसंकल्पातील अनुदान मागण्यांवर चर्चा आटोपती घेतल्याने बहिष्कार टाकणा-या विरोधी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधा-यांना लावणीच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने काम लवकर संपवण्याची घाई झाल्याचा आरोप केला विधानसभेमध्ये आज गृह, ऊर्जा, कामगार विभागावर चर्चा झाली व विरोधकांच्या अनुपस्थितीतच मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या.
विधानभवनाजवळील एनसीपीए येथे आजपासून तीन दिवस लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, तिथे हजेरी लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे आमदार उत्सुक असल्याची चर्चा सोमवारी विधानभवनात होती.
अर्थसंकल्पीय मागण्यांच्या चर्चेसाठी नियोजित वेळ संपत आल्यावर तालिका अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी मंत्र्यांनी उत्तर द्यावे म्हणून सांगितले. त्यावर खडसे यांनी या चार महत्त्वाच्या विभागांवर सदस्यांना बोलायचे आहे, त्यामुळे चर्चा सुरू ठेवावी, अशी मागणी केली. कामकाज समितीमध्ये गरज पडल्यास वेळ वाढवू, असे ठरल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर विरोधकांना चर्चेसाठी पाच तास दिले. आता चार मंत्र्यांच्या उत्तरासाठी वेळ हवा असल्याचे सांगितले. तसेच त्यानंतर एक विधेयकही मंजूर करून घ्यायचे असल्याचे ते म्हणाले. त्यावर आक्षेप घेत गिरीश बापट यांनी अशा पद्धतीने कामकाज होणार असेल तर विरोधक त्यात भाग घेणार नाहीत, असा इशारा दिला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरून गोंधळ घालायचा प्रयत्न केला. खडसे यांनीही त्यावर ताबडतोब कामकाज समितीची बैठक बोलावून निर्णय घ्यायला लावा, असे सांगितले. तसेच बाहेर लावण्यांचा कार्यक्रम असल्याने मागण्या आटोपत्या घेता का, असा टोमणाही खडसे यांनी लगावला. दोन लाख 64 हजार कोटी रुपयांच्या या मागण्या असल्याने त्या घाईने कशा काय मंजूर करून घेणार असे ते म्हणाले. सत्ताधारी पक्षाला एका दिवसात त्या मंजूर करायच्या असतील तर कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकतो, असे त्यांनी सांगितले.
घोटाळ्यांची चर्चा नको म्हणूनच निलंबन : खडसे
पालकमंत्री देवकर यांनाही अटक करा...एकनाथराव खडसे