आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्री असुरक्षित तर आमची काय कथा? ४२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घेरले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमदारांनी सोमवारी टार्गेट केले. अशोक चव्हाण यांच्यासारखा माजी मुख्यमंत्री राज्यात सुरक्षित नसेल, तर आमच्यासारख्या सामान्य आमदारांची काय कथा, असा थेट सवाल 40 हून अधिक आमदारांनी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा चेहरा केविलवाणा झाला.
राज्य सरकारने नेमलेला आयोग ‘आदर्श’ची जमीन राज्याचीच असल्याचे म्हणत असतानाही सरकार ही भूमिका ठोसपणे का मांडत नाही, सीबीआयकडे तपास दिलेला नसल्याचे न्यायालयाला यापूर्वीच ठोसपणे का सांगितले गेले नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती आमदारांनी केली. काँग्रेस मुख्यमंत्र्यांविरुद्ध एवढ्या आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याची 20 ते 25 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
विधान भवनात झालेल्या बैठकीत आदर्श प्रकरणाबरोबरच मतदारसंघांतील रखडलेल्या कामांबद्दलही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले.
42 आमदार पाठीशी!- काँग्रेसच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना आदर्श घोटाळ्यात अडकवून काँग्रेस संपवण्याचे षड्यंत्र भाजपने आखले असल्याचे पत्र काँग्रेस आमदारांनी सोनियांना लिहिले आहे. यात चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट करून 42 आमदारांनी पत्रावर सह्या केल्या आहेत.
तीन आमदार उठून गेले- आदर्श प्रकरणी पक्षाच्या बोटचेप्या भूमिकेबद्दल बैठकीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त झाली. मुख्यमंत्री तसेच काँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घेतली नसल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री चव्हाण समर्थक आमदार अब्दुल सत्तार, सुनील केदार आणि रामप्रसाद बोर्डीकर हे निषेध करत बैठक सोडून उठून गेले.
मुख्यमंत्र्यांचा खुलासा- बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी आमदारांची नाराजी काढण्याचा प्रयत्न केला. आदर्शचे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आपण आश्चर्य व्यक्त केले होते. ही राज्य सरकारची जमीन असून केवळ गहाळ झालेल्या आदर्शच्या फाइल्स शोधण्यासाठी सीबीआयने तपास सुरू केला होता, असे ते म्हणाले. मात्र आमदारांच्या मुद्द्यांवर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे आमदारांची नाराजी कायम राहिली.
अब्दुल सत्तार संतप्त- चव्हाण यांचे कट्टर समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांनीही मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला. आदर्श घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एक आयोग नेमला, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही तपास सीबीआयकडे कसा दिला, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर शरद पवार त्यांच्या पाठीशी राहतात. मग काँग्रेस पक्ष गप्प का? असा संताप व्यक्त केला. त्यावर काँग्रेस सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, चव्हाण या ज्येष्ठ नेत्यांच्या पाठीशी राहील, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण पुन्हा गोत्यात; हॉटेलला वाढीव एफएसआय
अशोक चव्हाणांसह 13 जण आरोपी, 150 साक्षी तपासल्या
सीबीआयकडून अशोक चव्हाणांसह गिडवानींवर आरोपपत्र दाखल