आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Teams Of 30 Officers Involved In The Crime Branch Mumbai For Majer Fire Mantralay

मंत्रालय अग्निकांडांचा सीबीआयच्या 30 अधिकार्‍यांकडून तपास सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मंत्रालय अग्निकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरु झाला आहे. 30 अधिकार्‍यांची टीम या कामात दिवसरात्र परिश्रम घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली‍.
मंत्रालयाला लागलेली आग ही दुर्घटना होती की घातपात? याची सखोल चौकशी सुरु झाली असून याकामी चार वेगवेगळ्या टीम परिश्रम घेत असल्याचे संयुक्त पोलिस आयुक्त (सीबीआय) हिमांशू राय यांनी सांगितले. या अग्निकांडाची चौकशी अनेक अंगांनी केली जाणार आहे. प्रत्येक शंका तपासली जाणार आहे. या कामात फॉरेंसिक विशेषज्ज्ञ (एफएसएल) आणि फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांची मदत घेतली जात आहे. एफएसएलचे अधिकारी मंत्रालयातील नमुने गोळा करण्यात व्यस्त आहे. फॉरेंसिक अहवाल आल्यानंतर आग कशामुळे लागली, हे स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे मंत्रालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येणार आहे, असे राय यांनी माहिती दिली.
दरम्यान, राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयाला गुरूवारी भीषण आगीने वेढले होते. या आगीत मंत्रालयाचे चार मजले भस्मसात झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता.
मंत्रालय अग्नितांडव; सजावट भोवली, प्‍लायवूडने केला घात
जेथून केलं जात राज्याचं संरक्षण तेच मंत्रालय झालं आगीच्या भक्षण !
VIDEO : मंत्रालयाला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे खाक
LIVE: मंत्रालयात आगीचे तांडव; मुख्यमंत्री कार्यालय जळून खाक, पाच जखमी
PHOTOS: मंत्रालयात भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक