आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात कोठेही पाठवा एसएमएस, फुकटात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंधरा वर्षांपूर्वी ‘हॉटमेल.कॉम’ संकेतस्थळ आणून इंटरनेटच्या जगात मुशाफिरी करण्याचा नाद लावणारे सबीर भाटिया आता आपल्या ‘जॅक्स्टर एसएमएस’ या जगातील पहिल्यावहिल्या मोफत आणि अनोख्या अशा अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाइलकरांना ‘एसएमएस’च्या दुनियेत घेऊन जात आहेत.
विशेष म्हणजे या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने मोबाइलप्रेमींना जगातील कोणत्याही फोनवर अमर्याद एसएमएस (सध्याच्या मर्यादेनुसार अर्थातच 200) ‘चकटफू’ पाठवणे शक्य होणार आहे.
सबीर भाटिया आणि योगेश पटेल म्हणाले की, हे अभिनव अ‍ॅप्लिकेशन जगभरातील 197 देशांमध्ये सध्या उपलब्ध आहे. हे एक ‘डाऊनलोडेड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’ असून वापरकर्त्याला अन्य कोणत्याही मोबाइलवर अमर्याद एसएमएस मोफत पाठवता येऊ शकतात. हे खुले मोबाइल अ‍ॅप्लिकेशन असल्यामुळे मोबाइलधारकाला ते इन्स्टॉल करण्याची गरज लागत नाही. ‘जेएक्सटीआरएसएमएस.कॉम या संकेस्थळावरूनही ते सहज डाऊनलोड करता येऊ शकते.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने भारतामध्ये दररोज 200 एसएमएस पाठवण्याची मर्यादा घातली आहे. त्याबाबत
विचारले असता भाटिया म्हणाले की, दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसारच एसएमएस
पाठवण्यात येतील आणि त्याची जबाबदारी आमचे सर्व्हर चांगल्या प्रकारे पार पाडतील.
ही एसएमएस सुविधा फुकट असली तरी जाहिराती, अर्काइव्ह, रिट्राइव्ह, आॅनलाइन मेसेज डाऊनलोड यासारख्या अन्य माध्यमातून कंपनीला महसूल मिळेल, असेही ते म्हणाले.
नवी क्रांती
जगभरात मोबाइलचा वापर वाढत असून आजच्या घडीला इंटरनेटपेक्षा मोबाइलमध्येच मोठ्या संधी आहेत. 2003 या वर्षात 3 अब्जपेक्षा जास्त एसएमएस पाठवण्यात आले. परंतु 2015 पर्यंत ही संख्या 12 ट्रिलियनपर्यंत जाणार आहे. त्यामुळे मोफत एसएमएस सुविधा देऊन नवीन क्रांती घडवण्याचा मानस भाटिया यांनी या वेळी व्यक्त केला.
जॅक्स्टर एसएमएस संकेतस्थळाची वैशिष्ट्ये
जगातील हे पहिले असे टेक्स्टिंग अ‍ॅप्लिकेशन आहे.जे वापरकर्त्याला इन्स्टॉल असण्याची गरज भासत नाही.
आयफोन, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी आणि जे 2 एमई यासह सर्व प्रमुख मोबाइलवर मोफत डाऊनलोड सुविधा
मोबाइल वापरकर्त्याला जगातील दुस-या कोणत्याही मोबाइल फोनवर टेक्स्ट एसएमएस पाठवण्याची सोय. एसएमएस प्राप्त करणा-या व्यक्तीकडे हे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल असण्याची आवश्यकता नाही.
या एसएमएसमध्ये मोबाइलकर्त्याचा नंबर राखला जातो आणि साइन-अप होताना नव्या नंबरची गरज नाही.
पाच पैसे खर्च न करता जगभरात या अ‍ॅप्लिकेशनचा मोफत आणि खुलेपणाने वापर करण्याची सुविधा.