आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Can Look Hot Without Wearing A Bikini: Sonam Kapoor

सुडौल बांधा झाल्यास बिकिनीचा विचार - सोनम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शुक्रवारी अब्बास मस्तानचा बहुचर्चित ‘प्लेयर्स’ हा चित्रपट धडाक्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात बिपाशा बसू ही रेड हॉट बिकिनीमध्ये दिसली आहे. या पार्श्वभूमीवर सोनमला पत्रकारांनी बिकिनी घालून चित्रपटात कधी दिसणार, असा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, माझा बांधा ज्या वेळेस बिकिनी घालण्यायोग्य होईल तेव्हा मी बिकिनी घालण्याचा विचार करीन.
‘प्लेयर्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शुक्रवारी सोनमने पत्रकारांना अनेक बोल्ड उत्तर देऊन घायाळ केले. या चित्रपटात सोनमने एका अल्लड मुलीची भूमिका साकारली असून ती यामध्ये संगणक हॅकर आहे. या वेळी बोलताना सोनमने सांगितले की, बिपाशाने याआधीदेखील चित्रपटात अनेकदा बिकनीचा पेहराव केला आहे. तसेच प्लेअर्स पटकथेनुसार तिने बिकिनी घालणे जरुरी होते. त्यामुळे माझे बिकनी घालणे आवश्यक नव्हते. तसेच माझ्या शरीराची ठेवण ही बिकिनी घालण्यायोग्य नाही. माझी फिगर ही दीपिका किंवा अनुष्कासारखी नसल्याचे सोनमने या वेळी सांगितले. खासगी आयुष्यात मी अतिशय बोल्ड आहे. मला ज्या कपड्यांचा पेहराव करायचा असतो ते कपडे मी आवर्जून घालते. त्यासाठी मला कोणचीही बंधन नसते. तसेच बोल्डचा अर्थ हा केवळ कमी कपडे घालणे, असा होत नसल्याचे सोनमने सांगितले. मी सध्या साधा आहार घेत असून मला सामान्य मुलींसारखे राहण्यास आवडते असेही तिने सांगितले.
‘सावरिया’च्या आधी 90 किलो वजन - ‘सावरिया’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सोनमचे वजन तब्बल 90 किलो होते. त्यानंतर चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर तिने खूप मेहनत घेऊन आपला बांधा सुडौल केला होता. यावर सोनमने सांगितले की, काही अभिनेत्री या झिरो फिगर करून बिकिनी घालतात, तर काही अभिनेत्री या वजनदार असूनदेखील आकर्षक दिसतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे विद्या बालनने द डर्टी पिक्चरमध्ये साकारलेली भूमिका, असेही सोनमने सांगितले.