आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kakkad Planned Murder Mystery With Simran As 'heroine' And Palande As Story Writer !

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मर्डर मिस्ट्री तयार करताना करण कक्कडचाच झाला मर्डर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण कक्कड हत्येप्रकरणातली पुढची माहिती आता समोर आली आहे. करण कक्कड मर्डर मिस्ट्रीवर आधारित चित्रपट तयार करण्याच्या विचारात होता. करण कक्कडने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार होणा-या या सिनेमात सिमरन सुदला मुख्य अभिनेत्री म्हणून लॉन्च करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्ष आयुष्यात कुख्यात गुंड असणारा विजय पलांडे या सिनेमाची कथा लिहिणार होता. विजय पलांडे सिमरन सुदचा काका असल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे या सिनेमाला तयार करण्याची मुळ कल्पनाच सिमरनचे काका विजय पलांडे उर्फ करन सूदची होती. गँगस्टर संतोष शेट्टीच्या टोळीतला विश्वासपात्र सदस्य म्हणून विजय पलांडेला ओळखले जाते.मुंबई पोलिसांनी पलांडेला सीरिअल किलर म्हणून घोषित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज टिक्कूचे वडील अरुण टिक्कू यांच्या हत्येनंतर आता करण कक्कडच्या हत्येप्रकरणी विजय पलांडेचे नाव पुढे आले आहे. करण कक्कडच्या हत्येप्रकरणात सिमरन सुद आणि विजय पलांडे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

या प्रकरणात आणखी जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, करणच्या सिनेमात के के मेनन आणि निल नितीन मुकेश भूमिका करतील आणि सिमरन त्यांना साईन करण्यात यशस्वी होईल, असे आश्वासन सिमरने करणला दिले होते. शिवाय जे निर्माते करणच्या सिनेमात पैसे गुंतवू शकतील अशा निर्मात्यांशीही सिमरनेने त्याची भेट घडवून दिली होती. इतकचं नाही तर करणने मॉडेल आणि अभिनेत्री रोझलीन खानलाही सिनेमात पैसा गुंतवण्याच्या अटीवर चित्रपटात प्रमुख भूमिका देण्याचे कबूल केले होते.
टीव्ही अभिनेत्री सिमरन सूदला अंधेरीत अटक
करण कक्‍कडची निर्घृण हत्‍या करुन मृतदेहाचे तुकडे केल्‍याचे उघड
निर्मात्याच्या अपहरणाची चौकशी मॅच फिक्सिंगच्या दिशेने, सिमरनवर करडी नजर