आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैला खान हत्याकांड : डीएनएसाठी सांगाड्यांचे नमुने पाठविले- हिमांशू रॉय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पाकिस्तानी अभिनेत्री लैला खानसह कुटुंबातील सहा लोकांची हत्या तिचे सावत्र वडील परवेझ टाक यानेच केली. मुंबई गुन्हे शाखा विभागाने सात दिवसांच्या पडताळणीनंतर बुधवारी याबाबत घोषणा केली. दरम्यान, डीएनए चाचणीसाठी सांगाड्यांचे नमुने परिक्षणाचे पाठवण्यात आल्याचे रॉय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई गुन्हे शाखा विभागाचे सहायक आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले की, उंटदरी (ता. इगतुपरी) येथील फार्महाउसवरून हत्येसाठी वापरण्यात आलेली सळई आणि चाकूही मिळाला आहे. सेप्टी टँकमधून काही दागिनेही मिळाले आहेत. परवेझने संपत्तीच्या वादातूनच सर्वांची हत्या केली. फार्महाउसमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचे सांगाडे मिळाले आहेत.
लैलाच्या हत्येचे कारण- लैलाचे लग्न दुबईतील मुनीर पटेलसोबत झाले होते. त्यामुळे तिचे कुटुंब दुबईला कायमचे स्थलांतरित होणार होते. परंतु, परवेझजवळ पासपोर्ट नव्हता. सेलिना दुसरा पती आसिफ शेख याच्या संपर्कात होती. त्यामुळे परवेझ टाक नाराज होता. सेलिनाने आपल्या काही संपत्तीचा वारस आसिफला बनविले होते.
फार्महाऊसवर सापडलेले सांगाडे लैला आणि तिच्या कुटुंबियांचे: हिमांशू रॉय
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर
EXCLUSIVE : दाऊदच्या इशा-यांवर नाचत होती बॉलिवूड अभ‍िनेत्री लैला