आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laila Khan The New Muse Of Dawood, Involved In Hawala Transfers For Lashkar

EXCLUSIVE : दाऊदच्या इशा-यांवर नाचत आहे बॉलिवूड अभ‍िनेत्री लैला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभ‍िनेत्री आणि मुळची पाकिस्तानी असलेली लैला खान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि त्याच्या 'डी' कंपनीसाठी काम करत असून सध्या ती दुबईत आहे. जम्मू-काश्मीर मधील क्राईम ब्राँचला दिलेल्या जबाबात परवेज अहमद टाकने सांगितले आहे की, लैलाला त्याने दुबईत पहिले आहे. ती सध्या दाउद आणि त्याच्या कंपनीच्या इशा-यांवर नाचत आहे.
दिव्य मराठी डॉट कॉमने काही दिवसापूर्वीच खुलासा केला होता की, २००८ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री लैला खानचे लष्कर-ए-तैय्यबाशी कनेक्शन असून, ती सध्या दुबईत वास्तव्यास आहे. परवेज अहमद टाकने क्राईम ब्राँचला सांगितले आहे की, लैलाने दाउदच्या हवाला ऑपरेटरच्या मुलाशी लग्न केले असून सध्या ती दुबईतच आहे.
परवेज अहमद टाकला जम्मू-काश्मीर क्राईम ब्राँचने गुरुवारी अटक केली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, लैला आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्य बनावट पासपोर्टच्या मदतीने देशाच्या बाहेर पडले आहेत. इंटेलिजन्स ब्यूरोच्या सूत्रानुसार परवेज अहमद टाकणे हे ही सांगितले आहे की, मुंबईत असताना तो दाउदचा हवाला नेटवर्क चालवणारा कमल यदानीला भेटला होता.
लैलाने यदानीचा मुलगा सोनू एलियास वाफी याच्याशी लग्न करून दुबईला पलायन केले आहे. तिथे ती दाउदला जाऊन भेटली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आतंकवाद वाढवण्यासाठी तिने काळा पैसा दाउदच्या मदतीने लष्कर-ए-तैय्यबाला पुरवला.
जम्मूचे पोलीस उपाधीक्षक अबरार चौधरी यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, परवेजने आपल्या जबाबात सांगितले आहे की, लैलाने सोनू नावाच्या एका माणसाशी लग्न केले असून, ती भारत सोडून गेली आहे. परवेज अहमद टाकच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांची एक टीम किश्तवाडला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली आणि मुंबईतील बॉम्ब स्फोटात लैलाचा हात असण्याची शक्यता आहे.
बॉलिवूड अभ‍िनेत्री लैलाचा आणखी एक साथीदार पोलिसांच्या जाळ्यात
बॉलिवूड अभिनेत्री लैलाचे लष्कर-ए-तैय्यबाशी कनेक्शन!