आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE: मंत्रालयात आगीचे तांडव; मुख्यमंत्री कार्यालय जळून खाक, पाच जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: राज्याच्या मंत्रालयाला गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय भक्ष्य केले. या आगीत सीएम आणि एसीएम यांचे कार्यालय पूर्णपणे जळून खाक झाले आहे. पाच जण या आगीत जखमी झाल्याचे वृत्त आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत असून लष्कर आणि फोर्स- वनची मदत घेण्यात येत आहे. राज्यपाल शंकरनारायण् यांनी घटनास्थळाची हवाई पाहाणी केली. नौदलाचे चॅपर हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहचले आहे.
आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपूते यांच्या कार्यालयाला आग लागली होती. त्यानंतर ती सर्वत्र पसरली. आग लागून दोन तास उलटले असून आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. फायर ब्रिगेटच्या गाड्या मागविण्‍यात आल्या आहेत. पाण्‍याची टंचाई जाणवत असल्याचे वृत्त आहे. चौथ्या मजल्याला लागलेली आग आता तिसर्‍या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरही पसरली असून कार्यालयांमधील महत्त्वाच्या फाईल्स आणि साहित्य जळून खाल झाले आहे.
आगीने मंत्रालयात लोळ उठत असल्याने परिसरात धूर पसरला आहे. या धुराने गुदमरुन दोन कर्मचारी बेशुद्ध पडले असून त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. या आगात जीवित हानी झाली नसली तरी मंत्रालयाचे मोठे नुसान झाले आहे. महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रे जळून खाक झाले आहे. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
PHOTOS: मंत्रालयाच्या 'सहाव्या' मजल्यापर्यंत पोहचली आग
शॉर्टसर्किटमुळे आग; 1 लाखाचे नुकसान
‘महिंद्र’च्या स्टोअरला भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान